भारत-पाकिस्तान सीमेवरचे कुंपण

0
745

 गोवा खबर:गुजरातमध्ये भारत-पाकिस्तान सीमा 508 किलोमीटर लांबीची असून, यापैकी 340 किलोमीटरवर प्रत्यक्ष कुंपण घालणे शक्य आहे. 280 किलोमीटर कुंपणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 60 किलोमीटर लांबीचे कुंपण मार्च 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

168 किलोमीटर सीमेवर प्रत्यक्ष कुंपण शक्य नसल्यामुळे सीमासुरक्षा दलाच्या जवानांची गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर करत, सीमेचे रक्षण केले जात आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.