भारतीय सैन्यामध्ये भरती वाढविण्यासाठी उपाययोजना

0
233
गोवा खबर:भारत सरकारने, भारतीय सैन्यात पात्र तरूणांची भरती वाढविण्यासाठी, कमी प्रमाणात भरती होत असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून व त्यांना प्रेरणा देऊन, संपूर्ण भारतातील युवकांची भारतीय सैन्यात भरती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
या संदर्भात गोव्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यामध्ये, एकत्रित प्रयत्न, संभाव्य उमेदवारांसाठी पूर्व-भरती प्रशिक्षण आणि जागरूकता मोहीम, अशा उपक्रमांचा समावेश असेल.
भरती संचालनालयाची, गोव्यातील उमेदवारांसाठी दरवर्षी गोव्यात स्वतंत्र रॅली आयोजित करण्याची योजना आहे. जानेवारी/फेब्रुवारी, २०२१ मध्ये, पणजी येथे, भरती मेळावा घेण्याचे नियोजन केले गेले आहे.