भारतीय विदेश सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींनी घेतली राष्ट्रपतींची भेट 

0
744

गोवा खबर:भारतीय विदेश सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थी (2018 ची तुकडी) तसेच रॉयल भूतान फॉरेन सर्व्हिसमधील दोन अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि प्रभाव यांचा विस्तार होत असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना सांगितले.  जागतिक संबंधांमध्ये राजनीती आणि आर्थिक दृष्टीकोनामुळे आशिया केंद्रबिंदू बनत आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. या संदर्भात भारताला महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे असेही ते म्हणाले.

भारत आणि त्याचे जगातील स्थान याबद्दल जागतिक समुदाय प्रशंसा करत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. हवामान बदल, सायबर सुरक्षा, मानवी दुर्घटना किंवा दहशतवादाशी मुकाबला यासारख्या जागतिक आव्हानांवर उपाययोजना शोधून काढण्यासंदर्भात इतर देश भारताकडे बघत आहेत असेही राष्ट्रपतींनी सांगितले. या सर्वांमुळे आपल्या कुटनीति समोर नवी आव्हानं तर उभी राहणार आहेतच पण अभूतपूर्व संधी उपलब्ध होणार आहे असे राष्ट्रपती म्हणाले.