भारतीय विज्ञान महोत्सवाचे १६ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान आयोजन

0
889

 

साय-फी महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये पाहायला मिळणार विज्ञान फिल्म निर्मिती स्पर्धा

 दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी २०१८

 विज्ञानविषयक प्रेरणा देणाऱ्या, व्यक्त करणाऱ्या, भावना मांडणाऱ्या किंवा दखल घेणाऱ्या फिल्म्स

निवडीसाठी पात्र

 विभागामध्ये पाच मिनिटांपर्यंत कालावधीचे आणि पाच मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा समावेश

 सर्वोत्तम फिल्मला मिळणार २५ हजार रुपयांचे रोख बक्षिस
 बक्षिसाची एकूण रक्कम एक लाख रुपये.

वार्षिक उपक्रम असलेल्या साय- फ्फी गोवा २०१८ भारतीय विज्ञान महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे १६ ते
१९ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. गोव्यात विज्ञानविषयक फिल्म निर्मितीला
चालना देण्याच्या हेतूने विज्ञान परिषद, गोवाद्वारे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, गोवा सरकार आणि एंटरनेटमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि गोवा कला
महाविद्यालय यांचा पाठिंबा लाभला आहे.

विज्ञान फिल्म निर्मिती स्पर्धा ही साय- फ्फि महोत्सवाचा आकर्षक भाग आहे. या स्पर्धेमध्ये दोन पाच
मिनिटांपर्यंतच्या कालावधीच्या फिल्म्स आणि पाच मिनिटांपेक्षा जास्त कालावधीच्या फिल्म्स असे दोन विभाग
करण्यात आले आहे. सर्वोत्तम फिल्मला २५ हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. तीन सर्वोत्तम फिल्म्सना
रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. इतर विभागांमध्ये सर्वोत्तम दिग्दर्शन/संशोधन सादरीकरण आणि सर्वोत्तम
छायाचित्रण, संकलन आणि डिझाइन यांचा समावेश आहे. बक्षिसादाखल दिली जाणारी एकूण रक्कम एक लाख
रुपये असून १६ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभात ती दिली जाईल.
ही स्पर्धा विज्ञान फिल्म्सच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली असून महोत्सवात
दाखल केल्या जाणाऱ्या सर्व फिल्म्स विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित असायला हव्यात. त्यांचे विषय गोव्यातील
विज्ञानाशी संबंधित उदा. संशोधन, विश्लेषण किंवा नाविन्य अथवा विज्ञान व तंत्रज्ञानातील नामवंत व्यक्तिमत्त्व
असे असायला हवेत. विज्ञानविषयक प्रेरणा देणाऱ्या, व्यक्त करणाऱ्या, भावना मांडणाऱ्या किंवा दखल घेणाऱ्या
फिल्म्स निवडीसाठी पात्र ठरतील.
एकापेक्षा जास्त प्रवेशिकांना परवानगी आहे, मात्र प्रत्येक प्रवेशिका स्वतंत्र अर्ज, नोंदणी आणि डीव्हीडी किंवा
पेन ड्राइव्हमध्ये शक्यतो एचडी प्रकारात दाखल केली गेली पाहिजे. इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांतील
फिल्म्ससाठी उपशीर्षके असणे आवश्यत आहे. महोत्सवाच्या प्रचारासाठी सर्व प्रवेशिकांसोबत सिनेमा निर्मितीचे
फोटो/स्लाइड्स योग्य प्रकारे जोडलेले असणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागीला त्यांची फिल्म अस्सल
असल्याची व ती कोणत्याही प्रकारे नक्कल नसल्याचे हमीपत्र द्यावे लागेल.

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या फिल्म्स दाखल करण्याचे खास आमंत्रण आहे, कारण ते विज्ञानाशी संबंधित
कोणत्याही विषयावर आपल्या मोबाइल फोनवरून चित्रीकरण करून मोठी बक्षिसे जिंकू शकतात.
फिल्म दाखल करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१८ आहे.
भारतात दशकांपासून साय- फाय सिनेमांचे प्रस्थ हिंदी व तमिळ सिनेमांइतकेच प्रचलित असून गेल्या दहा
वर्षांत ते जास्त विस्तारले आहे. मि. इंडिया हा अतिशय प्रसिद्ध आणि पहिला साय- फाय हिंदी सिनेमा आहे.
तेव्हापासून इतक्या वर्षांत प्रेक्षक आणखी प्रगल्भ झाला असून त्याला आता निर्भेळ व वास्तववादी साय- फाय
आशयाची अपेक्षा आहे. आपण कोई मिल गया आणि त्यानंतरच्या क्रिश सिनेमाच्या मालिकांमध्ये उत्कृष्ट साय-
फाय सिनेमे पाहिले आहेत.