भारतीय पर्यटन खात्याकडून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचे आयोजन

0
542

 गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाची देशभर अंमलबजावणी सुरु आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानात गोवा राज्याची सांगड झारखंड या राज्याबरोबर घालण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या भारत पर्यटन खात्याने झारखंड राज्यातील पर्यटनाविषयी माहिती देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

आज केंद्रीय विद्यालय बांबोळी आणि केंद्रीय विद्यालय क्रमांक-1 वास्को, या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना स्लाईड शोच्या माध्यमातून झारखंड राज्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच यावर प्रश्नमंजूषा घेऊन विजेत्यांना पारितोषकं प्रदान करण्यात आली. याप्रसंगी भारत पर्यटनचे सहायक संचालक जगदीप ठोंबरे, पर्यटन अधिकारी परेश डेरे यांची उपस्थिती होती. सोमवारी याच उपक्रमांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पर्वरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.