भारतीय पर्यटन खात्याकडून योग शिबिराचे आयोजन

0
1053

 

 

 

 गोवा खबर:केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या भारत पर्यटन खात्याने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगाचे महत्त्व आणि जागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये वारसा स्थळांजवळ (हेरिटेज साईट) योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

राज्यात यासाठी कोळवा समुद्रकिनाऱ्याची निवड करण्यात आली आहे. तसेच राजधानी पणजीमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ताळगाव सामुदायिक केंद्रात गोवा राज्य योग अकादमीच्या सहकार्याने सकाळी साडेनऊ वाजता योगसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पर्यटन विभाग, राज्य सरकार, ग्राम पंचायत ताळगाव, जीटीडीसी यांनी पुढाकार घेतला आहे. योग सत्रात डॉन बॉस्को शाळेचे विद्यार्थी, ऑक्झिलीम कॉन्वेन्ट शाळा, करंजळे, सरकारी प्राथमिक विद्यालय, ताळगाव, अवर लेडी ऑफ रोझरी आणि सरकारी प्राथमिक विद्यालय, दोनापावल यांचा सहभाग आहे.