भारतीय नौसेनेने मिळवलेल्या नव्या स्वस्त आणि नाविन्यपूर्ण  पीपीईच्या पेटंटमुळे  मोठ्या प्रमाणावर पीपीई बनवण्याचा मार्ग झाला सोपा

0
613

 

गोवा खबर:भारतीय नौसेनेने तयार केलेल्या वैद्कीय वैयक्तिक संरक्षण साधनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा बौध्दिक संपदा विभाग आणि  विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम राष्ट्रीय संशोधन विकास संस्था यांनी मिळून त्याचे बौध्दिक संपदा हक्क मिळविले आहेत. 

मुंबईत  नेव्हल डाँकयार्ड येथे अलिकडेच  सुरू झालेल्या इन्स्टिट्यूट आॅफ नेव्हल मेडिसीन   मधल्या  इनोव्हेटिव  विभागातल्या एका  नौसेनेतल्या डाॅक्टरने ही कमी किमतीची पीपीई  बनवली मुंबईतल्या नेव्हल डाकयार्ड येथे ही पीपीई प्रायोगिक तत्वावर आधीच  बनवली आहे.

नौसेनेने बनवलेली ही पीपीई एका विशिष्ट कापडापासून  बनवली असून  बाजारातील उपलब्ध पीपीईंपेक्षा ती संरक्षणाच्या दृष्टिने  उच्च प्रतिची आहे,  शिवाय ती वापरत असताना श्वास घेणेही सुलभ होते यामुळे आपल्या  देशातील उष्ण आणि  दमट हवामानात ती वापरणे सोयीचे आहे. आयसीएमआरच्या प्रयोगशाळेने त्याची  चाचणी आणि वैधता तपासलेली आहे.

नौसना, आयपीएफसी आणि एनआरडीसी या तिघांनी मिळून या स्वस्त किमतीच्या  पीपीईचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत  परवाना  घेऊन या पीपीईंचे जलदगतीनेउत्पादन तयार करण्यासाठी पात्र  व्यावसायिक कपन्यांचा एनआरडीसी शोध घेत आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी देशातील पहिल्या फळीच्या आरोग्य कर्मचार्यासाठी अशा प्रकारच्या कमी भांडवलात तयार होणाऱ्या  स्वदेशी   सोयीच्या आणि स्वस्त साधनांची महत्वपूर्ण आणि तातडीची निकड आहे.  इच्छुक  व्यावसायिकांनी अथवा स्टार्ट अप  कंपन्यांनी परवानाप्राप्त उत्पादन करण्यासाठी cmdnrdc@nrdcindia.com येथे संपर्क करावा.

नोव्हेंबर २०१८ सुरू झालेल्या मिशन रक्षा ग्यान शक्ती या  आयपीएफसीने   सुरू केलेल्या उपक्रमांसोबत भारतीय नौसनेतील  उद्यमशील तज्ञ  अनेक  नवनवीन  उपक्रम हाती घेत आहेत.  २०१८ सालापासून आत्तापर्यंत एकूण १५०० बौध्दिक संपदा हक्क (आयपी) प्रस्थापित झाले आहेत.