भारतीय जनता पक्षाचे  नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे  का नाही करत:आप

0
246
गोवा खबर:कोरोनामुळे गोव्यातील बहुतेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे गोव्यातील तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गोव्याचे देशातील रेटिंग 21 वरून 24 वर घसरले आहे,ही बाब गंभीर असून त्याला भाजप सरकार जबाबदार आहे,अशी टिका आप नेते सुरेल तिळवे यांनी केली आहे.

जीआयडीसीचे अध्यक्ष तथा भाजपाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी नुकतीच  मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री गोव्यातील व्यवसायांना परवानगी देत नसल्यामुळे राज्यात मंदी वाढतच आहे, अशी टीका केली होती.त्यावर आपने गोव्यात भाजप सरकारच्या कारभारामुळे सगळे घटक त्रासात पडले असल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील सरकार, विविध उद्योगांच्या विकासासाठी काम करीत नाही, तर जीआयडीसीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विकासासाठी काम करत आहे आणि स्वतःची भर करत आहे.त्यामुळे भाजपने आपले नाव बदलून भारती जनता प्रायव्हेट लिमिटेड ठेवावे.   ह्या वक्तव्यामुळे  हे स्पष्ट झाले आहे की सरकार उद्योग-व्यवसायांबाबतीत  उपाययोजनांवर विचार करीत नाहीये आणि गोमंतकीयांना स्वत:च्या नशिबावर सोडत आहे,असा आरोप तिळवे यांनी केला.
तिळवे म्हणाले,जेव्हा भाजपचे आमदार आणि गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलोदेखील  जीआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत बोलले आहेत. त्यामुळे या प्रकारामध्ये लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे.
” सरकारचा हाच नाकर्तेपणा अधिक उद्योग सुरू करण्यात आणि विद्यमान उद्योग सुरळीत चालवण्यात अडथळे निर्माण करत आहे आणि  ह्या सगळ्याला केवळ हे सरकार कारणीभूत आहे” असे टिकलो म्हणाले. त्यांचे विधान हेच सिद्ध करते की गोव्यातील औद्योगिक विकासाची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारचा निष्काळजीपणा आणि असमर्थता आहे.” याकडे तिळवे यांनी लक्ष वेधले.
आपचे नेते अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी जीआयडीसी आणि एकूणच सरकारी प्रशासनातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधत  पुढे म्हटले कि  यामुळेच  गोव्यातील औद्योगिक परिस्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि गोव्यातील व्यवसाय घसरले आहे.
“घोटाळ्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजेच लेबर गेट स्कॅम म्हणजेच कामगार निधी घोटाळा , ज्यात भाजपाचे कार्यकर्ते आणि जि.प. उमेदवारांचे नाव औद्योगिक कामगार यादीमध्ये नमूद केले आहे आणि योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेल्या सर्व पैशाचा त्यांनी लाभ देखील घेतला आहे. जर आम्हाला तरूणांना नोकरी द्यायची आहे आणि तरुण उद्योजकांना नवीन व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे तर हा भ्रष्टाचार थांबवावा लागेल. जर आपल्याला हा सर्व घोटाळा थांबवायचा असेल तर आपल्याला सर्वांना “भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेडचा अंत करावा लागेल, असे तिळवे म्हणाले.