भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला उपराष्ट्रपतींची भेट

0
1460
The Vice President, Shri M. Venkaiah Naidu looking at various Exhibits, at the National Museum of Indian Cinema, in Mumbai on April 26, 2019. The Governor of Maharashtra, Shri C. Vidyasagar Rao is also seen.

गोवा खबर:उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली. या संग्रहालयामुळे चित्रपट रसिकांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले त्यांचे आवडते चित्रपटकलाकार आणि संगीताच्या जादुई दुनियेची रंजक सफर घडेलअसे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

भारतीय चित्रपट जगात सर्वाधिक लोकप्रिय असून प्रत्येक भारतीयाला सिनेमा बघणे आवडते. त्यामुळे हे प्रभावी माध्यम सामाजिक परिवर्तनाचे साधनही बनू शकतेअसे ते म्हणाले. चित्रपट रसिकांना दर्जेदारउत्तमकथा दाखवून त्यांना शिक्षित आणि सक्षम करण्याचे काम चित्रपटसृष्टी करू शकतेअसे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपट संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपले अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केले.

Link: https://m.facebook.com/story.php?story_fbid=442469006321018&id=167328870501701

या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव ही उपस्थित होते.