भारतीय आणि इस्रायली चित्रपटात अनेक साम्यस्थळे- डॅन वोल्मॅन, इफ्फी 2018 चे जीवन गौरवाचे मानकरी

0
1233

 

 गोवा खबर:भारतीय आणि इस्रायली चित्रपटात अनेक साम्यस्थळे असून दोन्ही देशांनी आपापल्या चित्रपटांचा सखोल शोध घेण्याची गरज डॅन वोल्मॅन यांनी गोव्यात 49 व्या इफ्फीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. वॉल्मॅन यांना गोव्यात यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

The Consul General of Israel in Mumbai, Ya’akov Finkelstein, the Israeli Director and Writer, Mr. Dan Wolman and David Silber at a press conference, during the 49th International Film Festival of India (IFFI-2018), in Panaji, Goa on November 21, 2018.

आयुष्य जगण्यासाठी लागणारा पैसा कमविण्यासाठी काही वेळा आपण चित्रपट केले मात्र वृद्धावस्था, वेश्या व्यवसाय, गे संदर्भातल्या समस्या यासारख्या विषयांवर चित्रपट तयार करण्याची आपली नेहमीच इच्छा राहिल्याचं वोल्मॅन म्हणाले.

भावभावनांचे अप्रत्यक्ष आणि सूक्ष्म चित्रीकरण करण्यावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

रंगभूमी ही उत्कंठावर्धक आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे कमी खर्चिक साधन आहे असे सांगून इस्रायलमधे 18 चित्रपट विद्यालये असून इस्रायलला रंगभूमीची महान परंपरा लाभल्याचे त्यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

इस्रायली समाज हा विविध पारंपारिक आणि स्थलांतरितांनी बनला असल्यामुळे चित्रपट निर्मिती आव्हानात्मक ठरल्याचे वोल्मॅन म्हणाले. मात्र विविधता हे आमचे बळ असून आमच्या चित्रपट विषयक नैपुण्याचे दर्शन यातून घडते.

भारत आणि इस्रायल या देशांना चित्रपट क्षेत्रात व्यापक व्यापार संधी असल्याचे मत इस्रायलचे मुंबईतले महावाणिज्य दूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांनी व्यक्‍त केले. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशातल्या चित्रपटांनी उभय देशातल्या जनतेमधले शतकांपासूनचे संबंध अधिक दृढ करावे अशी इस्रायलच्या पंतप्रधानांची इच्छा असल्याचे याकोव्ह म्हणाले.

इफ्फीच्या कंट्री फोकस विभागात इस्रायलची भूमी, इतिहास आणि सामाजिक प्रश्न मांडणारे दहा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. इस्रायलचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि या देशात चित्रीकरणासाठी असलेल्या अमाप संधीचा लाभ घेण्यासाठी भारतीयांना, इस्रायलमधे येण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिले.

‘द अदर स्टोरी’ हा चित्रपट दोन बंडखोर युवतींवर आहे. या चित्रपटाशी आपला भावबंध जुळल्याचे इस्रायलचे निर्माते डेव्हीड सिल्बेर यांनी या चित्रपटाविषयी बोलतांना सांगितले. वस्तू संग्रहालय क्युरेटर म्हणून असलेली कारकीर्द सोडून आपण चित्रपट निर्माते झालो. केवळ करमणूक देणे हा आपला उद्देश नसून आपल्या प्रेक्षकांना वैचारिक खाद्य पुरवणे हा आपला हेतू असल्याचे सिल्बेर म्हणाले.