भारतात सर्वाधिक विक्री होणारी ख्यातनाम मारुती सुझुकी अल्टो सलग 16 वर्षे आघाडीवर, आजही सातत्य कायम

0
159

 

  • सलग 16 वर्षे देशातील निर्विवाद बेस्टसेलर!
  • आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसोबतच सुटसुटीत डिझाइन, सोपी हाताळणी आणि उत्तम इंधन क्षमतेमुळे अल्टो ही गाडी खरेदीदारांसाठी प्राधान्यक्रमाचा पर्याय आहे
  • पहिल्यांदाच गाडी घेणाऱ्यांसाठी ही गाडी पहिला पर्याय असतो

गोवा खबर:मारुती सुझुकी अल्टो या गाडीला सलग 16 वर्ष भारतातील सर्वाधिक विक्रीची गाडी म्हणून नावाजण्यात आले आहे. पहिल्यांदाच गाडी घेणाऱ्यांसाठी अल्टो  ही नेहमीच प्राधान्यक्रमाचा पर्याय राहिली आहे आणि गाडी चालवण्याची इच्छा असलेल्या तरुण भारतासाठी ही गाडी म्हणजे अभिमानाची बाब आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये ही गाडी सादर करण्यात आली. तेव्हापासून अल्टोने कायमच वाढत्या लोकप्रियतेचा अनुभव घेतला आणि या काळात भारतातील गाडी खरेदीदारांसाठी ही गाडी म्हणजे अभिमानाचे प्रतिक ठरली. अल्टोचा हा वारसा गेल्या दोन दशकांचा आहे. 2004 मध्ये ही गाडी भारतातील सर्वाधिक विक्रीची गाडी ठरली. अल्टोला सामान्य जनतेमध्ये मिळालेली लोकप्रियता अतुलनीय आहे आणि त्यामुळे सलग गेली 16 वर्षे अत्यंत स्पर्धात्मक अशा प्रवासी गाडीच्या विभागात ही सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली आहे.

भारतातील गाडी खरेदीदारांच्या वेगाने बदलणाऱ्या आवडीनिवडींना अनुरुप राहण्यासाठी अल्टोसुद्धा सातत्याने बदल स्वीकारत स्वत:मध्ये नवे बदल घडवत आहे. सुटसुटीत आधुनिक डिझाइन, सोपी हाताळणी, उच्च इंधन क्षमता आणि नवनवी सुरक्षा आणि आरामदायीपणाची वैशिष्ट्ये यांचा उत्तम आणि अनोखा मेळ ही अल्टोच्या यशाची कारणे आहेत. अल्टोमधील सोयीस्कर आणि वापरण्यास योग्य अशा वैशिष्ट्यांना स्टायलिश लुक तसेच मारुती सुझुकीच्या विश्वास आणि विश्वासार्हतेची जोड मिळाल्याने नवी अल्टो भारतीय ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक पर्याय ठरते.

या लक्षणीय यशाबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) श्री. शशांक श्रीवास्तव म्हणाले, “भारतीय ऑटो क्षेत्रात सातत्याने नवे मापदंड स्थापित करत गेली सलग 16 वर्षे अल्टो निर्विवाद नेतृत्वस्थानी विराजमान आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पातळीवरील स्पर्धात्मक गटात या गाडीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अतुलनीय कामगिरी, सुटसुटीत डिझाइन, सोपी हाताळणी, उच्च इंधन क्षमता, परवडणारे दर आणि सातत्याने सोयीस्कर आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमधील बदल यामुळे हे यश शक्य झाले आहे. समृद्ध वारसा जपणारी अल्टो आजही देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना आकर्षित करत असते. 76 टक्के ग्राहक आपली पहिली गाडी म्हणून अल्टोला पसंती देतात.

ते पुढे म्हणाले, “अल्टोच्या आजवरच्या अतुलनीय वाटचालीमुळे तरुण आणि नवभारताला प्रवास करणे शक्य झाले आणि लाखोंची स्वप्ने प्रत्यक्षात उतरली. अल्टोची दणकट ग्राहकसंख्या म्हणजे हा ब्रँड सातत्याने अपग्रेड होत नव्या गोष्टींचा अंतर्भाव करतो हे ग्राहकांना आवडत असल्याची पावतीच आहे. ग्राहकांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडींवर मारुती सुझुकीचे बारीक लक्ष असते आणि ते त्यानुसार आपल्या उत्पादनांमध्ये बदलही करतात. सलग 16 वर्षे अल्टो भारतातील सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरल्याने ग्राहकांनी या ब्रँडवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

नव्या दमदार एअरो एज डिझाइन आणि नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे अल्टो ग्राहकांना गाडी बाळगण्याचा संस्मरणीय अनुभव देते. BS6 समर्थित अशी अल्टो ही सुरुवातीच्या विभागातील भारतातील पहिली गाडी आहे आणि यात पेट्रोल प्रकारात 22.05 किमी./ली आणि सीएनजी प्रकारात 31.56 किमी./ली. अशी इंधन क्षमता मिळते.

नव्या अल्टोमधील साधारण सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये चालकाच्या बाजूला एअरबॅग, एबीएस आणि ईबीडी, रीव्हर्स पार्किंग सेन्सर, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि चालक आणि शेजारच्या प्रवाशासाठी सीट बेल्ट रीमांइडर अशा सुविधा आहेत. गाडी धडकणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नव्या नियमांचाही यात समावेश आहे.