भारतात सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना याकरिता जागतिक बँकेबरोबरच्या 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ऋण करारावर भारताच्या स्वाक्षऱ्या

0
1021

 

नवी दिल्लीभारतात सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना याकरिता जागतिक बँकेबरोबरच्या 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या ऋण करारावर भारताच्या स्वाक्षऱ्या

 

गोवा खबर:   भारतात, सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना यासाठी जागतिक बँकेसमवेत 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (समतुल्य) आयबीआरडी ऋणासाठी नवी दिल्लीत एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतातर्फे अर्थविषयक व्यवहार खात्याचे सहसचिव समीर खरे यांनी तर जागतिक बँकेतर्फे जागतिक बँकेचे भारतातले प्रभारी संचालक हिशम अब्दो यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

देशांतर्गत नवकल्पनेची जोपासना करणे, स्थानिक उत्पादन विकासाला चालना देणे आणि कौशल्य आणि पायाभूत सुविधा यामधली तफावत कमी करुन व्यापारीकरण प्रक्रियेला गती देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. देशात समावेशक विकासासाठी कल्पक आणि माफक दरात आरोग्य उत्पादन निर्मिती त्याचबरोबर देशात स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने हा करार करण्यात आला आहे., 25 एप्रिल 2018

भारतात, सर्वसमावेशक प्रकल्पांसाठी नवकल्पना यासाठी जागतिक बँकेसमवेत 125 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (समतुल्य) आयबीआरडी ऋणासाठी नवी दिल्लीत एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतातर्फे अर्थविषयक व्यवहार खात्याचे सहसचिव समीर खरे यांनी तर जागतिक बँकेतर्फे जागतिक बँकेचे भारतातले प्रभारी संचालक हिशम अब्दो यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

देशांतर्गत नवकल्पनेची जोपासना करणे, स्थानिक उत्पादन विकासाला चालना देणे आणि कौशल्य आणि पायाभूत सुविधा यामधली तफावत कमी करुन व्यापारीकरण प्रक्रियेला गती देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. देशात समावेशक विकासासाठी कल्पक आणि माफक दरात आरोग्य उत्पादन निर्मिती त्याचबरोबर देशात स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने हा करार करण्यात आला आहे.