भारतातील पहिल्या नैसर्गिक काळे क्षारयुक्त पाणी ‘इव्होकस एचटूओ ची गोव्याकडे कूच

0
612

 

 

  • ५०० मिली, २५० मिली, ५०५मिली अशा विविध प्रकारातील पीईटी बाटल्यांमध्ये तसेच ३३० मिलिच्या काचेच्या बाटल्यात उपलब्ध. क्रांतिकारी पाणी गोव्यातील विमानतळ, हॉटेल्स, क्लब्स, रेस्टॉरंट्स, कॉमर्स वेबसाइट तसेच निवडक फार्मसीज आणि फूड कोर्टवर उपलब्ध आहे.
  • मासिक सबस्क्रिप्शनच्या रुपातही ग्राहकांसाठी उपलब्ध. यासाठी १२, २४ आणि ६० बाटल्यांची डिलिव्हरी मोफत शिपिंगसह उपलब्ध.

गोवा खबर: भारतातील पहिले भरपूर खनिजयुक्त, ब्लॅक अल्कलाइन वॉटर ‘इव्होकस एचटूओ’चा निर्माता एव्ही ऑरगॅनिक्सने गोव्यात ब्रँडचे लाँचिंग केले. ग्राहकांची प्रतिकारशक्ती वाढण्याकरिता योग्य हायड्रेशनद्वारे डिटॉक्झिफिकेशन करणारी उत्पादने पुरवण्याच्या ब्रँडच्या उद्दिष्टाचाच हा एक भाग आहे.

वडोदरा येथील स्टार्टअपने जून २०१९ मध्ये इव्होकस एचटूओ विक्रीस सुरुवात केली. या क्रांतिकारी क्षारयुक्त पाण्यात ७० पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजे असून त्याला अनोखा काळा रंग प्राप्त झालेला आहे. हे उत्पादन १०० टक्के नैसर्गिक असून ते शाश्वत हायड्रेशन, उत्कृष्ट डिटॉक्झिफिकेशन, अॅसिडिटी कमी करून शरीरातील पीएच पातळी संतुलित करते. तसेच चयापचय क्रिया वाढवून जागरूकताही वाढवते. तसेच, ग्लूकोज कॅलरीज, कार्बमध्ये शून्य प्रमाणात वाढ करणारा, नव्या युगातील ग्राहकांसाठी तसेच नेहमीच पुढे चालणाऱ्या मिलेनिअल्ससाठी हे एक विलक्षण पौष्टिक बूस्टर आहे.

हे उत्पादन चार पुनर्वापरायोग्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ५०० मिली पीईटी बॉटल, २५० पीईटी बॉटल, ५०५ एमएल पीईटी बॉटल आणि ३३० एमएल ग्लास बॉटल. अॅमेझॉनवरील या उत्पादनाच्या ग्राहकांनी याला ५ पैकी ४.५* रेटिंग दिले आहे. म्हणूनच आता हा ब्रँड ऑफलाइन विस्तार योजनेवर लक्ष केंद्रीत करत आहे. गोव्यातील ग्राहकांना निरोगीपणा आणि योग्य हायड्रेशन व डिटॉक्झिफिकेशनद्वारे प्रोत्साहन देत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे. इव्होकस एचटूओ हे गोव्यातील इंटरनॅशनल एअरपोर्ट, प्रमुख ४ आणि ५ तारांकित हॉटेल्स, क्लब्स, कॅसिनोज,  रेस्टॉरंट्स (फिशरमन्स कोव्ह, कर्लीज, डे बागा डेक, लिओज, इत्यादी), ई कॉमर्स वेबसाइट (ड्रिंकेव्होकस डॉट कॉम, स्विगी, अॅमेझॉन, मॅगसन, डेल्फिनोज, ऑक्सफोर्ड, एजी सुपरमार्केट, डीजी मार्टसारख्या रिटेल चेन्स आणि गोव्यातील सुपरमार्केट चेन), फार्मसीज आणि फूड कोर्टवर उपलब्ध असेल.

या लाँचिंगबद्दल बोलताना एव्ही ऑरगॅनिक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री आकाश वाघेला म्हणाले, आमचे लाँचिंग अधिकाधिक दृश्यमान होणे तसेच टार्च २०२१ पर्यंत टीअर आणि टीअर मार्केटपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या योजनेचाच एक भाग आहे. ब्रँडच्या स्थापनेपासून ग्राहकांची प्रतिकार क्षमता वाढवणे, यावर आमचा भर आहे. तसेच सध्याच्या काळात लोकांना आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा जागृत झाल्याचे पाहून चांगले वाटते. अर्थात, ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीत वाढ झाल्याचे पाहून ग्राहक त्यांच्या जीवनशैलीत थोडे बदल करून जीवनाकडे जागरूकतेने पाहत आहेत, हे कळते.”

 

पाण्याचे मार्केट ९०० कोटी रुपयांच्या घरात होते आणि आता ते २२ टक्क्यांच्या सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. एव्ही ऑरगॅनिक्सने गुजरातमधील वडोदरा येथे पूर्णत: स्वयंचलित निर्मिती आणि बॉटलिंग प्लांट प्रस्थापित करण्यासाठी १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पात वर्षाला ४० दशलक्ष बाटल्या तयार करण्याची क्षमता आहे. कंपनीने आतापर्यंतच्या कामकाजात १.५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली असून जून २०२१ पर्यंत ३.५ दशलक्ष इव्होकसच्या बॉटल्स विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे.

इव्होकस एचटूओविषयी

इव्होकस एचटूओ हे साधे पाणी नाही. हे प्रीमियम, क्रांतिकारी, नव्या युगाचे, क्षारयुक्त पाणी असून पृथ्वीच्या खोलीतून मिळवलेल्या  ७० पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजांमुळे याला काळा रंग प्राप्त झालेला आहे. १०० टक्के नौसर्गिक असे इव्होकस एचटूओ हे  अत्याधुनिक आणि निर्जंतुक प्रकल्पात  मानवी स्पर्शाविना तयार केले जाते, स्वयंचलित पद्धतीने बाटलीत भरले जाते. हे दिवसभरात उत्कृष्ट हायड्रेशन, उत्तम डिटॉक्झिफिकेशन, सुधारीत चयापचय आणि अतिरिक्त जागरूकता प्रदान करते. इव्होकस एचटूओच्या एकाच बाटलीत एक चांगला अनुभव , आरोग्याचे प्रतीक, स्टाइल स्टेटमेंट आणि अगदी वेगळ्या प्रकारे गेम चेंजर अशी सर्व वैशिष्ट्य समाविष्ट आहेत.