भारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच

0
654

 

गोवा खबर : भारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे लाँच करण्यात आली.आम्ही गोव्यात पहिल्यांदाच मांसाहारी इडली लाँच करणार आहोत.हे लाँचिंग जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ गौरब सरकार,ओह इडलीच्या गार्गी चौधरी तसेच योगेश नाईक आणि शेफ सुनीत शर्मा यांच्या हस्ते गोवा मॅरीअट रिसॉर्ट अँड स्पा येथे करणार आहोत.

याविषयी बोलताना जिएसबीचे सीईओ गौरब सरकार म्हणाले की “आम्हाला सहकार्य केल्याबद्दल ‘ओह लेडी’ आणि जिएसबी हे शेफ सुनित शर्मा,योगेश नाईक आणि गोवा सरकारचे आभारी आहोत.” या उत्पादनाचे महत्व ओळखून ते बाजारात लाँच करण्यात गौरब सरकार यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

जिएसबी यांनी कोविड काळात गोव्यातील ‘ओह इडली’च्या  स्त्री उद्योजिका गार्गी चौधरी यांचे सशक्तीकरण केले असून ‘ओह इडली’साठी गुंतवणूकदार शोधले आहेत. तसेच त्यांनी फ्रांचाईझी मॉडेलचा वापर करून गोव्याच्या मिश्र संस्कृतीपर्यंत ‘ओह इडली’ चा व्यापार पोहोचवण्यासाठी, वाढविण्यासाठी मदत केली आहे. 

याविषयी बोलताना जिएसबीचे सीईओ गौरब सरकार “म्हणाले की ज्या गोवन स्टार्टअपना मोठे व्हायचे आहे अशा  सर्व स्टार्टअपचे आम्ही स्वागत करतो.”

याविषयी बोलताना ‘ओह इडली’च्या गार्गी चौधरी म्हणाल्या की “सध्याच्या डिजिटल युगात तसेच कोविड परिस्थितीत क्लाउड किचनचे महत्व वाढले आहे.लोक घरातून फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून आमचे अन्नपदार्थ मागवू शकतात.आमचे बेस किचन हे बार्देशमध्ये असेल तर थोड्याच काळात सर्व गोव्यात क्युएसआर सुरू करणार आहोत.येथे तुम्हाला स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार केलेले पदार्थ टेकअवे पद्धतीने नेता येतील.ही सुविधा प्रथम उत्तर गोव्यात तर नंतर सर्व गोव्यात उपलब्ध होईल.

आम्ही हे पदार्थ फूड व्हॅनच्या माध्यमातून गोव्यातील महत्वाच्या समुद्र किनारी उपलब्ध करून देणार आहोत.यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना या नव्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल. तसेच यामुळे सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होईल.”गार्गी चौधरी यांचा जन्म कोलकोता येथे झाला असून त्या २०१४ साली आपल्या पतीसह गोव्यात आल्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की “इडली हा प्रसिद्ध दाक्षिणात्य शाकाहारी पदार्थ आहे,हा पदार्थ संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.हा पदार्थ शुद्ध शाकाहारी असल्याने अनेक मांसाहारी लोक इडली खात नाहीत.या साच्यातून बाहेर पडण्यासाठीच ओह इडली स्थापन करण्यात आली आहे. आम्ही या शाकाहारी पदार्थाला मांसाहारी ट्विस्ट दिला आहे.ही मांसाहारी इडली चविष्ट तसेच आरोग्यदायी आहे. आमचे पदार्थ हे स्वच्छ तर असतातच पण त्याशिवाय ते बनविताना आम्ही मिनरल वॉटर,मशिनरी आणि उच्च दर्जाचे अन्न घटक वापरतो.

आम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड करत नाही.यामुळेच आम्ही आरोग्य आणि चव यांचा विचार करून मांसाहारी फ्लेवर्ड इडली लाँच केली आहे.ही इडली तुम्ही दुपारी अथवा रात्रीही खाऊ शकता.

याआधी तुम्ही तोंडाला पाणी आणणारी अशी चविष्ट इडली  कधीच खाल्ली नसेल.याच्यासाठी आम्ही गोव्याची निवड केली कारण गोव्यामध्ये जगभरातील लोक येतात व त्यांच्या संस्कृतीचे एकमेकांसोबत संबध तयार होतात.सध्याच्या डिजिटल युगात तसेच कोविड परिस्थितीत क्लाउड किचनचे महत्व वाढले आहे.लोक घरातून फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून आमचे अन्नपदार्थ मागवू शकतात.”

गोव्यात राहिल्यामुळे त्यांना कळाले की गोव्याच्या मार्केटमध्ये स्पर्धा कमी आहे,येथील मार्केट अजूनही खुले आहे,गोवा भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे आणि येथील लोक खाण्याचे शौकीन आहेत.या सर्वांचा विचार करून उद्योजिका बनण्यासाठी त्यांनी फूड क्षेत्रात स्टार्टअप चालू करण्याचे ठरविले.येथे विविध देशातील पर्यटक येत असल्याने येथे ब्रँड मार्केटिंग करणे हे अन्य राज्यांपेक्षा सोपे जाईल असे त्यांना वाटले.यानंतर त्यांनी या स्टार्टअपबाबत जिएसबीसोबत चर्चा केली व अनेक पध्दतीचा अभ्यास करून मग त्यांनी हे उत्पादन भारतात सर्वप्रथम लाँच करण्याचे ठरविले.ओह इडली म्हणजे जिएसबीच्या इकोसिस्टीमने घेतलेला धाडसी पुढाकार आहे.

जिएसबी इकोसिस्टीम काय आहे ?

जिएसबी इकोसिस्टीम हे एक टूल असून ते कोणत्याही क्षेत्रातील स्टार्टअपमधील समस्यांचे निराकरण करते.

भारतात पहिल्यांदाच व्यापाराशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही कधीही तज्ज्ञ लोकांची मदत घेऊ शकता.तुमच्या स्टार्टअपला भेडसवणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी हे वन स्टॉप सोल्युशन आहे.मग ती स्टार्टअपच्या संकल्पने विषयी असो वा त्याच्या बाजरीकरणा विषयी असो.

मार्केट हे सतत बदलत आहे आणि प्रत्येकजण काहीतरी नवीन आणि कल्पक करण्याचा प्रयत्न करत आहे.या स्पर्धात्मक मार्केटमध्ये टिकून राहणे अवघड बनले आहे. तुम्हाला यात जिएसबी इकोसिस्टीम मदत करेल.

आम्ही स्टार्टअप,एसएमइ यांच्यासाठी तसेच ज्यांना स्वतःचा बिझनेस मार्केटमधील इतर व्यापारापेक्षा सरस व्हायचे आहे अशांना आम्ही तज्ञांचा सल्ला पुरविण्याचे काम करतो.

आमचे ध्येय आणि आमची दृष्टी :

स्टार्टअप,एसएमइ यांना त्यांचा बिझनेस वाढविताना येणाऱ्या कोणत्याही समस्या सोडविणे तसेच त्यांचा बिझनेस योग्य मार्गावर आणणे हे आमचे ध्येय आहे.

सर्व स्टार्ट-अप, एसएमई, विद्यार्थी, पीएसयू, कॉर्पोरेट आणि शासन यांच्याकरीता व्यासपीठ तयार करण्यासाठी, जेणेकरून ते शोधत असलेले सर्व तज्ञ मार्गदर्शन मिळतील आणि त्यांचे संस्थात्मक उद्दीष्ट साध्य करू शकतील. 

कोर व्यवसाय समाधानासाठी सेवा :

आम्हाला माहिती आहे की तुमच्या या समस्या आहेत आणि आम्ही तुम्हाला यावर उपाय शोधून देऊ.

डिजिटल व्हा – आजकाल डिजिटल मार्केटिंग हे ब्रँड बनविण्यासाठी महत्त्वाचे बनले आहे,आणि त्यासाठी तुम्हाला डिजिटल बनणे आवश्यक आहे.तिथे काही समस्या आहेत ? घाबरू नका आमची तज्ज्ञ टीम तुमच्या सेवेला हजर आहे.

ब्रेक इव्हन पॉईंटमधून बाहेर पडा – जर तुमच्या व्यापारा मधून तुम्हाला अपेक्षित फायदा होत नसेल तर आमचे तज्ञ तुमची मदत करून तुमचा व्यापार वाढवू शकतात.

आर्थिक चणचण – व्यापारामध्ये भांडवल हे खूप महत्वाचे असते,जर तुम्हाला भांडवलाची,फंडची समस्या असेल तर जिएसबी इकोसिस्टीम तुमची नक्की मदत करेल.

कायदेशीर बाबी आणि कागदपत्रे – जिएसबी इकोसिस्टीम तुम्हाला सर्वोत्तम कायदेशीर मदत पुरवते.

कामगारांची कमतरता – जर तुम्हाला योग्य आणि पात्र उमेदवार मिळत नसतील तर आमची मनुष्यबळ  व्यवस्थापन टीम तुम्हाला योग्य आणि पात्र उमेदवार मिळवून देण्यासाठी मदत करेल.

व्यापारवृद्धी करण्यासाठी – तुमचा व्यापार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन तो यशस्वी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.

याशिवाय तुम्हाला आमच्या तज्ज्ञांकडून तुमच्या व्यापाराचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यापासून ते त्याच्यासाठी योग्य मोहीम आखण्यापर्यंत मदत मिळेल. तुम्ही केवळ तुमची समस्या सांगण्याचा अवकाश आमची जिएसबी इकोसिस्टीम टीम तुमच्या दारात हरज असेल.आम्ही असे मानतो की तुमचा व्यापार जेव्हा एक ब्रँड बनेल त्याचवेळी आमचे काम संपले.

तुमच्या दुपारच्या अथवा रात्रीच्या खाण्याची इच्छा असो ‘ओह इडली’ तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.तर मग तुमच्या तोंडाला पाणी आणणारी,चविष्ट आणि अद्वितीय इडली खाण्यासाठी तयार राहा आणि ओह इडली खाऊन तुमची तृष्णा पूर्ण करा.