भारताच्या माळेतील एक मणी झारखंड

0
1011

 

 

विविधतेच्या परिघांमध्ये श्वास घेणारा भारत आपल्या उदारवादी तत्वज्ञानामुळे खरेतर एक एकनिष्ठ भारत आहे. भारतीय राज्यांनी आपल्या सार्वभौम राष्ट्राच्या छत्राखाली आपापल्या सामाजिक, सांस्कृतिक, वर्तणूक विषयक वैशिष्ट्ये सुरक्षित ठेवली आहेत. भारताला एक घर मानले आणि सर्व भारतीय राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना या घराच्या खिडक्यांच्या रूपात पाहिले तर दृश्य अगदी तसेच वाटेल- जसे आपण एखाद्या वसाहतीत संध्याकाळच्या वेळी सूर्य अस्ताला जात असताना रहिवाशांचा कुतूहल मिश्रित वावर पाहत आहोत. साधारणपणे एखाद्या वसाहतीत रांगेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, इमारती असतात आणि संध्याकाळच्या वेळी आपापल्या घरांची प्रवेशद्वारावर महिला, मुले, तरुण उभे राहून रस्त्यावरचे  प्रत्येक दृश्य, व्यक्ती वगैरे पाहत आपल्या इच्छेनुसार संध्याकाळचा वेळ व्यतीत करतात. अंधार पडल्यावर रस्त्यावरच्या अनेक आठवणी आपल्या मनात डोक्यात साठवत रहिवासी आपापल्या खोल्यांमध्ये परत येतात. भारताचा स्वभाव अगदी असाच आहे.  विशाल देह, अत्याधुनिक वर्तन आणि वैविध्यपूर्ण आचरण, मात्र सगळे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. एक भारत श्रेष्ठ भारतचे समग्र स्वरूप आणि  धारणा देखील हीच आहे.

झारखंड हे देशातले एक नव्याने स्थापन झालेले राज्य आहे जे 15 नोव्हेंबर  2000 रोजी बिहार राज्यापासून वेगळे झालेल्या पूर्व बिहारमध्ये दक्षिणी बिहार नावाने ओळखले जात होते. जंगले मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आधी याचे नाव वनांचल ठेवण्याचा विचार झाला होता , मात्र अखेरीस याला झारखंड नाव मिळाले. झारखंडचा संपूर्ण भूभाग पठारी आहे. झारखंडला आदिकाळात  कीकट प्रदेश,  मगध, ब्रात्य प्रदेश, पौंड्र, पुन्ड्र, अर्क खंड किंवा कर्क खंड, नागपूर, झारखंड, कोकराह, खुखरा, चुटिया नागपुर,  नागपुर आदी नावांनी ओळखले जायचे. मोगल काळात हिऱ्यांसाठी हा भाग  प्रसिद्ध होता. भौगोलिक तथ्यानुसार पूर्वीच्या काळी   ज्वालामुखीचा स्फोट झाल्यामुळे सध्याचे छोटा नागपुर पठार निर्माण झाले. 32 आदिवासी जमातींना झारखंडचे पूर्वज होण्याचे सौभाग्य लाभले आहे ज्यामध्ये काही जमाती उदा.बिरहोर असुर, पहाड़िया वगैरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आणि सरकारी प्रयत्नांद्वारे मोठ्या मुश्किलीने या जमातींचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आदिवासींच्या नंतरही काही जमातींनी झारखंडला आपले घर बनवले, ज्यांना मूळ रहिवासी म्हटले जाते. आदिवासींच्या बरोबरीने सहभागी हा समाज त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून या भागात आपले ठोस अस्तित्व दाखवत आहे.

सध्याचा झारखंड प्रदेश केवळ 19 वर्षाचा आहे. मात्र याच्या इतिहासात  कला, साहित्य , पुराभिलेख , शैल चित्र, खानपान आणि परंपरांचा अमूल्य वारसा या प्रदेशाकडे आहे. झारखंडचा मूलभूत इतिहास तिथल्या आदिवासी परंपरांशी जोडलेला आहे, ज्या निसर्गाच्या अवतीभवतीच फिरत असतात. इथल्या लोकांनी घनदाट जंगलांमध्ये, हिंसक जंगली श्वापदे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितिचा सामना करत निसर्गाच्या रक्षणाचे महत्व जाणले आणि इथल्या पूर्वजांनी आपल्या पुढच्या पिढयांनाही निसर्गाचे महत्व समजावले. सुदूर जंगली जनजीवनात आयुष्य व्यतित करणारे काही आदिवासी कुटुंबे आजही तुम्हाला भेटतील, ज्यांचा शहरांशी दुरान्वयानेही काही संबंध नाही. ते जिथे राहतात, तिथे ते निसर्गाकडून तेवढेच घेतात जेवढी त्यांची गरज असते. झाडे तोडून त्यांचा उपयोग जळण म्हणून वापरण्याची परंपरा इथे आहे. इथे  मानवी अस्तित्वाच्या मूलभूत संकल्पनेत पाणी, जंगल आणि जमीन केन्द्रस्थानी आहे. . पाण्याचे स्रोत अबाधित राहिले पाहिजेत, जेणेकरून  शेतीची कामे चालू राहतील.जंगले नेहमी हिरवीगार राहावीत ,जेणेकरून पर्यावरण सुरक्षित राहील, वन्यजीवांचे संरक्षण होईल. जमीन अशासाठी कारण तीच एक अक्षय साधन आहे जे किमान प्रतिकूल परिस्थितीत देखील शरीराचे पोषण करेल. बस, एवढीशीच इच्छा आहे झारखंडमधील आदिवासी लोकांची .

झारखंडच्या लोकांच्या खाण्यापिण्यात एक वेगळा आणि आश्चर्य कारक फरक आढळतो. त्यांचे सर्व खाण्याचे पदार्थ पोषणाचे भांडार आहेत. आणि बहुतांश असे पदार्थच खाल्ले जातात जे नैसर्गिकरित्या खाण्यालायक आहेत. आदिवासीना माहित आहे कि मडुवा (रागी) नियमित सेवन केले तर बाळंतीण मातेला रक्तक्षय होणार नाही. रागी कधीकाळी इथले मुख्य जेवण होते मात्र आता सर्व प्रकारची धान्ये खायला लागले आहेत. बहुतांश ग्रामीण लाल तांदूळ खाल्ला जातो जो कर्बोदके, जीवनसत्व आणि खनिजांचा स्रोत आहे. चवलाई , पालक, गोंदली, ओल, कचू,  रागी, महुआ कधीकाळी आदिवासींच्या मुख्य जेवणाच्या पदार्थांमध्ये समाविष्ट होते. आजही आदिवासी पदार्थांची ओळख याच खाद्यपदार्थात दडली आहे. झारखंडच्या निर्मितीनंतर अलिकडच्या वर्षात राज्याबाहेर आयोजित होणाऱ्या खाद्य महोत्सवात इथल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जाऊ लागला आहे. गेल्यावर्षी गोव्यात आयोजित खाद्य महोत्सवात  झारखंडच्या पदार्थांच्या स्टॉलवर जेव्हा परदेशी पाहुण्यांनी पदार्थांचा आस्वाद घेतला तेव्हा सर्वानी त्यांची प्रशंसा केली. अनेक परदेशी नागरिकांनी झारखंड स्टॉलवरच्या महिला स्वयंसेवकांकडून  झारखंडचे पदार्थ बनवण्याविषयी माहिती जाणून घेतली जेणेकरून ते आपल्या घरी ते पदार्थ करून पाहू शकतील. झारखंडच्या आदिवासी खाद्यपदार्थांची चर्चा जेव्हा जेव्हा होईल , तेव्हा निसर्गाशी त्याचा संबंध नेहमीच जवळचा असेल.

सांस्कृतिक ओळखीचा विषय निघतो , तेव्हा त्याबाबतीत झारखंडचे लोक अतिशय साधे आणि निश्चल असतात. इथल्याबद्दल असे म्हटले जाते की बोलणे  गीत आणि चालणे नृत्य आहे. ताल सुरु झाल्याबरोबर पाय आपोआप थिरकायला लागतात, म्हणूनच इथे आखाड्याची संस्कृती आहे. सगळे सण-उत्सव आखाड्यात साजरे केले जातात जिथे नैसर्गिकरित्या पूजाअर्चेरात्रभर गीत आणि नृत्याचे कार्यक्रम सुरु असतात. दिवसभर मेहनत आणि संध्याकाळ झाल्याबरोबर अलमस्ती, काहीसे अशाच प्रकारचा स्वभाव इथल्या आदिवासींचा आहे. इथल्या सर्व प्रमुख जमातीतील समूहांची आपापली अलहता गीत आणि नृत्य शैली आहे. सरहुल, कर्मा यांसारखे नैसर्गिक उत्सव असतील किंवा लग्न-विवाह , गाणी आणि नृत्य याशिवाय कुठलाही उत्सव पूर्ण होत नाही. आखाडा एक प्रकारे सामूहिक मिलन स्थळ आहे जे लोकांमधील अंतर कापण्याचे काम करते.

झारखंड रत्नगर्भा आहे. कोळसा, बॉक्साइट, अभ्रक, तांबे ,जिप्सम, लोखंड , युरेनियम सगळे काही इथे सापडते आणि देशाच्या विकासात योगदान देते. या राज्याने आता आपले पंख पसरवायला सुरुवात केली आहे. यावर्षी राज्याने आपल्यासाठी एक भव्य विधानसभा इमारत निर्माण केली. राजधानी रांचीला एक स्मार्ट शहर बनवण्याचे काम जोरात सुरु आहे. राजकीय दृष्ट्या परिपकव होत असलेल्या या राज्याचे नेते देखील आता राजकारणात माहीर व्हायला लागले आहेत. सगळ्याचे तात्पर्य हे की झारखंड आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत चालला आहे. भारत रूपी माळेत झारखंड एका छोट्या मण्याच्या स्वरूपात जरूर आहे मात्र सांख्यिकी दृष्ट्या या मण्याचे महत्व खूप आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वरूप आत्मसात करत झारखंड आज देशाच्या आवाजात आपला आवाज मिसळत आहे.

31 ऑक्टोबर 2015 रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या आयोजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विचार दिला कि भारताच्या विविध राज्यांच्या सांस्कृतिक विविधतेला अशा प्रकारे गुंफले जावे जेणेकरून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीशी ते  एकरूप होऊ शकेल, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आणि भारतातील प्रत्येक राज्य अन्य राज्यांच्या संस्कृतीची प्रशंसा करतात .या संपूर्ण प्रक्रियेत रन फॉर यूनिटी किंवा एकता दौड़ एक जबरदस्त भूमिका पार पाडत आहे ज्याचे आयोजन झारखंडसह भारतात सर्वत्र 31 ऑक्टोबर रोजी एकाचवेळी केले जाते आणि अशा प्रकारे संपूर्ण भारत एकात्मिक होऊन जातो. झारखंड आणि गोवा यांच्यात अनेक बाबतीत अद्भुत साम्य आहे , नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न ही दोन्ही राज्ये खनिज संपदेतही खूप संपन्न आहेत आणि अन्य राज्यांप्रमाणे ही दोन्ही राज्ये देखील भारतमातेची प्रिय सुपुत्र आहेत.

  लेखक: घनश्याम श्रीवास्तव, ज्येष्ठ पत्रकार, रांची