भारताच्या पोर्तुगालमधील राजदूत नंदिनी सिंगला यांची पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांच्याशी चर्चा

0
959

भारताच्या पोर्तुगालमधील राजदूत नंदिनी सांगला यांनी आज गोवा आणि
पोर्तुगालमधील पर्यटन हितसंबंध सुधारून क्रीडा व साहित्य क्षेत्रात देवाणघेवाण उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने
आपले म्हणणे मांडले.
गोव्याच्या धावत्या भेटीवर असलेल्या श्रीमती सांगला यांनी श्री. मनोहर आजगांवकर, पर्यटन मंत्री, गोवा
सरकार यांना पर्यटन भवन येथे आमंत्रित केले आणि दोन्ही प्रदेशांमधील हितसंबंध सुधारण्यासाठी काय करता
येईल यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
गोवा आणि पोर्तुगालमध्ये पर्यटनाचा हा समान धागा असल्याने आणि गोवा राज्यात पोर्तुगालच्या परदेशी
नागरिकांना आवडतील असे बरेच घटक असल्यामुळे श्रीमती सांगला यांनी गोवा टुरिझमला पोर्तुगीज ट्रॅव्हल
मार्टमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. राजदूतांनी यावेळेस एयर इंडियाशी बोलून व्यावसायिक सोय
लक्षातघेता लिस्बन ते भारत अशी थेट विमानसेवा सुरू करता येईल का याची विचारणा केली. त्यांनी गोव्याचा
श्रीमंत वारसा जपण्यासाठी संवर्धन आणि जतन कामासाठी पोर्तुगाल सरकारकडून काही मदत हवी आहे का,
अशी विचारणाही त्यांनी गोवा टुरिझमकडे केली.
या बैठकीसाठी  मिनिनो डिसूझा, पर्यटन संचालक,  निखिल देसाई, व्यवस्थापकीय संचालक, गोवा
पर्यटन विकास महामंडळ आणि  सॅव्हिओ मसायस, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा हे उपस्थित
होते.