भारताचे ॲक्ट इस्ट धोरण, संपूर्ण अग्नेय आशियासाठी महत्वाचे – डॉ. जितेंद्र सिंह

0
986
The Minister of State for Development of North Eastern Region (I/C), Prime Minister’s Office, Personnel, Public Grievances & Pensions, Atomic Energy and Space, Dr. Jitendra Singh releasing a book titled “Sub-Regional Cooperation between India, Myanmar and Bangladesh”, during a conference on ‘India-Myanmar Trade and Connectivity’, in New Delhi on April 23, 2018.

 

गोवाखबर:भारताचे ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण हे संपूर्ण आग्नेय आशियासाठी महत्वाचे असल्याचे ईशान्य विभाग विकास राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

‘भारत-म्यानमार व्यापार आणि दळणवळण’ या विषयावरच्या परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. इंडियन कौन्सील रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशनने ही परिषद आयोजित केली होती.

म्यानमार हा भारताच्या ॲक्ट इस्ट धोरणाचा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.