भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय; टी-२० मालिका खिशात

0
850
Indian cricket team poses with captain Virat Kohli, who was awarded the Man of the Match and the Man of the Series trophies, after winning the match during the fourth ODI cricket match between South Africa and India in Pretoria, South Africa, Friday, Feb 16, 2018. AP/PTI(AP2_17_2018_000047B)
गोवा खबर:भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-२० समान्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावा राखुन विजय मिळवला
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-२० समान्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावा राखुन विजय मिळवला. या विजयासहित दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकण्याचाही विक्रम केला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या जे.पी. ड्युमिनीच्या संघासमोर पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या सुरेश रैना आणि सलामीवीर शिखर धवन या डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारताची अचुक गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आफ्रिकेला केवळ १६५ धावांचीच मजल मारता आली. परिणामी भारताने ७ धावांचे अंतर ठेउन सामना जिंकला.