भाजप सरकारने गोव्याला  दिवाळखोरीत काढले:काँग्रेस

0
255
गोवा खबर:गोव्यातील जवळजवळ ७० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना ॲागस्ट महिन्याचा पगार भाजप सरकारने दिला नसुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने गोवा दिवाळखोरीला काढला आहे हे स्पष्ट झाले आहे अशी टीका काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीेश चोडणकर यांनी केली आहे. 
सरकारी तिजोरीत दमडी नसताना मुख्यमंत्री नवीन राजभवन बांधुन जून्या राजभवनाचे कॅसिनो भवनात रुपांतर करण्याचे स्वप्न पाहत आहेत. सरकारकडे कष्टकरी सरकारी कर्मचाऱ्याना कोविड संकट काळात वेळेत पगार देणे शक्य होत नाही यावरुन प्रमोद सावंतांचा प्रशासनावर ताबा राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे,असे चोडणकर म्हणाले.
मुख्यमंत्री आज आभासी दुनियेत वावरत आहेत,असे सांगून चोडणकर म्हणाले, अच्छे दिनाची स्वप्ने पाहत देशाची जिडीपी वजा २३.९ टक्के करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा बुडबूडा आता फुटला आहे.
गोमंतकीय जनतेने आता सरकारला जाब विचारण्यासाठी पुढे येणे गरजेचे असुन, आजारातुन बाजार करण्याचा भाजपचा एक कलमी कार्यक्रम आता बंद पाडलाच पाहिजे असे  चोडणकर म्हणाले.
सरकारने पुढिल दोन दिवसात कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यास सचिवालयाची वाट बंद करण्यास काॅंग्रेस पक्ष मागे पुढे पाहणार नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये असा इशारा  चोडणकर यांनी दिला आहे.
  • दरम्यान ,सर्व सरकारी कर्मचार्‍यांची व अनुदानित संस्थांची, ऑगस्ट २०२० महिन्याची (उत्तर व दक्षिण गोवा) देय तारखेच्या आत प्राप्त झालेली वेतन बिले, ३१ ऑगस्ट २०२० रोजी फेडण्यात आलेली आहेत, असे लेखा संचालनालयाने कळविले आहे. देय तारखेनंतर कोणतीही बिले प्राप्त झाल्यास, ती प्राधान्याने मंजूर करण्यात येतील, असेही कळवण्यात आले आहे.