गोवा खबर : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश समिती मोर्चाच्या अध्यक्षा डाॅ. शितल नाईक यांनी राज्य कार्यकारिणी जाहिर केली आहे. प्रदेश सरचिटणीसपदी शिल्पा नाईक व रंजिता पै यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी दिलायला लोबो, सरिता बोरकर, सावित्री कवळेकर, नयनी शेटगावकर, लक्ष्मी हरवळकर व स्वाती माईणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव पदाची धुरा तन्वी सावंत, वैशाली नाईक, सुकांती गावकर, डाॅ.स्नेहा भागवत, सोनाली नागवेकर, तन्वी कोमरपंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. खजिनदारपदी अनिता रायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीच्या सदस्यपदी बीना नार्वेकर, भारती नाईक, प्रतिमा होबळे, शीला पेडणेकर, स्मिता प्रभू पर्रीकर, स्मिता कुडतरकर, पल्लवी दाभोलकर, डाॅ. जास्मीन ब्रागांझा, हेमश्री गडेकर, चंदा नाईक देसाई, निकलाव गामा, दिक्षा तळावणेकर, महिमा देसाई, अनिता सुदेश कवळेकर, विश्रांती देसाई, खुशी वेळीप, सुनिता साळगावकर, सुलेखा शेटये, डाॅ.सरोज देसाई, दीपा शिरगावकर, मनिशा नाईक, प्रा.स्नेहा कारेकर, मिंगेलीना वेल्हो, प्रणीता कोरगावकर, आशा मोरे, सुमित्रा नाईक, प्रतीक्षा मयेकर, दया प्रभू तेंडुलकर, निहारीका मांद्रेकर व सिया गाड यांची नियुक्त करण्यात आली आहे.

अध्यक्षा डाॅ. शीतल नाईक यांनी सर्वांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा देताना पक्ष कार्य वृध्दीसाठी तसेच सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी प्रत्येकाने झटावे, असे आवाहन केले आहे.

