भाजप परिवाराचा ड्रग्स व्यवसाय प्रमोट करण्यासाठी आता रेव्ह पार्टीत बाॅलिवुड ताऱ्यांची उपस्थिती : काॅंग्रेस 

0
558
गोवा खबर : गोव्यात ड्रग्स हा भाजप परिवाराचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. सदर व्यवसायाची जाहिरातबाजी करण्यासाठी ब्रॅंड ॲंबॅसीडर म्हणुन बाॅलिवुड नटांचा समावेश आता रेव्ह पार्ट्यात करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे व खासदार विनय तेंडुलकर यांच्या आशिर्वादानेच परवा हणजूण येथे विदेशी पर्यटकांची पार्टी आयोजित करण्यात आली होती, असा घणाघाती आरोप काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
रेव्ह पार्टीचे मुख्य आयोजक कपिल झवेरी यांनी त्याचसाठी या तिन राजकारण्यांची भेट घेतली होती असा आरोप करून  चोडणकर यांनी सदर भेटींचे  फोटो पुरावा म्हणुन पत्रकारांसमोर ठेवले. गोव्यातील भाजप सरकारची नशा लवकर उतरली नाही तर पुढची पिढी ड्रग्स व्यवसायाने संपेल असा इशारा  चोडणकर यांनी यावेळी दिला.
रेव्ह पार्टीत अर्धनग्न नृत्य सादर करण्यासाठी बोलविण्यात येणाऱ्या रशियन मुलींना आणण्याची एक एजंसी कार्यरत आहे. सदर एजंसीचे सुत्रदार हे भाजपचे मंत्री व आमदार असल्याचा आरोप करुन, कपिल झव्हेरीने मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व खासदार विनय तेंडुलकर यांचे गोडवे गाणारे तसेच सरकारच्या सहकार्या बद्दल धन्यवाद देणारे पोस्ट समाजमाध्यमांवर टाकल्याचे कळंगुटचे माजी  आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी निदर्शनास आणून दिले.
आज कळंगुटचे व पर्वरीचे आमदार ड्रग्स व्यवसाया बद्दल समाजमाध्यमांवर विवीध पोस्ट टाकुन भाष्य करीत आहेत. या दोघांची चौकशी करावी अशी मागणी, फर्नांडिस यानी केली आहे. मंत्री मायकल लोबो व माजी मंत्री रोहन खंवटे यांचा ड्रग्स व्यवसायाशी जवळचा सबंध असल्याचा संशय फर्नांडिस यांनी व्यक्त केला.
 मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी माजी मंत्री विजय सरदेसाई यांना मंत्रीमंडळातुन डच्चू देताना ते भ्रष्टाचार करीत होते असे एक कारण सांगीतले होते व सदर भ्रष्टाचार बंद करण्यासाठीच बाबू कवळेकर यांची मंत्रीपदी नेमणुक करण्यात आली आहे असे वक्तव्य केले होते याची आठवण करुन देत, काॅंग्रेस अध्यक्ष  चोडणकर यांनी २८ मार्च २०१८ रोजी तत्कालीन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी जारी केलेले भ्रष्टाचाराला चालना देणारे परिपत्रक व १६- ब चे परिपत्रक अजुनही मागे घेतलेले नाही व लोकांची सतावणुक व भ्रष्टाचार चालुच असल्याचा आरोप यावेळी केला.
चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकरांच्या कारकिर्दीत नविन प्रकल्पांतील प्रत्येक फ्लॅटसाठी रुपये  ३० हजारे रुपये व दुकानांसाठी रुपये ४०हजार रुपये मंत्र्याना द्यावे लागतात अशी चर्चा आज नागरीकांत चालु असल्याचा दावा  चोडणकर यांनी केला.
काॅंग्रेस पक्षात असताना व विरोधी पक्ष नेते म्हणुन बाबू कवळेकर विधानसभेत व विधानसभे बाहेर १६-ब कलमाला विरोध करीत होते. सदर कलमाच्या आधारे जमीन रुपांतर करण्यास उघड विरोध करीत होते, परंतु आज त्याच १६-ब खाली जमीन रुपांतर चालुच आहेत,असे चोडणकर म्हणाले.
कुडका – बांबोळी येथे मोदी यानी ५५ हजार चौरस मिटर जागेत ७७ प्लाॅट्स विकसीत करताना, सरकारची मान्यता न घेताच मुख्य नगरनियोजक व नगर नियोजन बोर्डाचे अध्यक्षानी सदर जागा विकसीत करण्यास परवानगी दिल्याचा गौप्यस्पोट  चोडणकर यानी केला . सदर जागेतील उतरणीचा योग्य अभ्यास केला नसल्याचा आरोप देखील चोडणकर यांनी यावेळी केला.
गोवा फाॅरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यानी गृहमंत्री म्हणुन मायकल लोबो यांची नेमणुक करावी असे वक्तव्य केले होते त्यावर प्रतिक्रीया देताना  चोडणकर यांनी हा एनडीए पार्टनर मधला अंतर्गत विषय असल्याचे सांगुन, त्यावर आपण भाष्य करु शकत नसल्याचे सांगीतले
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना भारताचा चुकीचा नकाशा टाकल्याबद्दल महिला काॅंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो  यांनी जाहिर माफी मागीतल्याचे सांगुन, अजुनही कुणाच्या भावना दुखावलेल्या असल्यास आपण माफी मागतो असे चोडणकर म्हणाले.