भाजप गोंयकरांच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी भयभीत : आप

0
206
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज दामु नाईक यांच्या आम आदमी पक्ष व राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याबाबत वापरल्या गेलेल्या अपशब्दांचा तीव्र निषेध केला. हे लक्षात घ्यावे लागेल की, प्रत्येक गोंयकराला 300 युनिट वीज उपलब्ध करुन देण्याच्या आपच्या गोव्याच्या आश्वासनाने संपूर्ण भाजपा हादरले आहे आणि त्यांना आता लपण्यासाठी जागा शिल्लक नाही! ज्यांच्यासाठी काहीही केले नाही, अशा संतप्त मतदारांना भाजपला सामोरे जावे लागत असल्याने, ही निराशा दिसून येते.
ज्यांना काहीही केले नाही अशा नेत्यांना, प्रत्यक्षात ज्यांनी आपली आश्वासने पूर्ण केली आहेत त्यांच्यावर भाष्य करायला आवडते, ही गंमत आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत निवडणुकी दरम्यान केलेली आश्वासने पूर्ण केली आहेत आणि त्यांना विश्वास आहे की, गोवाही केजरीवाल मॉडेल पाहेल आणि विना अखंडित वीज मिळवेल. गोंयकरांना मदत करण्याच्या सर्व बाबींमध्ये अपयशी ठरलेल्या भाजपला हे सांगण्यासारखेच आहे.
भाजपाची सत्ता आल्यावर गोव्याचे कर्ज 6600 कोटी होते जे आता 20,000 कोटींवर गेले आहे.श्री.नाईक आपल्या सरकारच्या योजनांबद्दल बोलतात, पण खरं म्हणजे गोव्यातील स्त्रियांना महामारी त्या केंद्रस्थानी असतानाही या योजनेतून काहीही मिळालेले नाही. आप मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देत असताना, विद्यमान शाळांची देखरेख करण्यासही भाजपा सक्षम नाही. ‘आप’ हा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करणारा एकमेव पक्ष आहे,जे गोव्यात भाजपा करू शकले नाही.
आपचे नेते संदेश तेलेकर देसाई म्हणाले, “भाजपाच्या राजकारणाचे सामान्य गोंयकराशी किंवा मूलभूत कामांशी काही देणे-घेणे नाही.” “जर भाजपाला हिंमत करायची असेल, तर त्यांनी गोयंकरांना 24/7 वीज मोफत द्यावी. हे जर त्यांना करता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. आपने आपली सर्व दिलेली आश्वासने साध्य केली आहेत, भाजपाही असे म्हणू शकेल काय?” संदेश तेलेकर देसाई म्हणाले.