भाजपा वैयक्तिक लाभासाठी लँड कन्व्हर्जनसाठीची परवानगी देत आहे: आप 

0
339
भुमी रूपांतरणाची जागा आणि त्याचे हेतू स्पष्ट करा: आप
गोवा खबर:सध्या सुरू असलेल्या कोवीड १९ महामारीमध्ये  जवळ जवळ पाचशेहून अधिक गोमंतकीयांनी आपले प्राण गमावले आहेत आणि विविध घोटाळयांच्या मालिकाच आपल्या समोर आल्या आहेत. हे सगळे चालू असताना येथील भाजप सरकार ही परिस्थिती सुधारण्या ऐवजी गोव्यातील भुमी रूपांतरणाचे सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे,असा आरोप आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केला आहे.
 म्हांबरे म्हणाले, आघाडीच्या दैनिकांमध्ये जाहीर केलेली अधिसूचना निंदनीय आहे. त्यात जमीन मालकाचे नाव आणि इतर महत्वाच्या तपशीलांचा उल्लेख देखील केला नाही.
“टीसीपी विभागाने जी वृत्तपत्रांमध्ये १६ बी झोन रूपांतरण यादीतील सुचना प्रसिद्ध केली आहे त्यात सर्व मालमत्तेच्या मालकांच्या नावां शिवाय आणि त्या क्षेत्राचे क्षेत्रफळ रूपांतरित केले जावे यासाठी सूचना प्रसिद्ध केली आहे. आम्ही अशी आशा करतो आहे की पंचायती त्यांच्या गावात काय घडत आहे याची दखल घेत आहेत.
 या सगळ्यात सरकार काहीतरी लपवीत आहे. या महामारीच्या काळात सरकारने घेतलेला  भू-रूपांतरणचा निर्णय खरोखरच शंकास्पद आहे,असे सांगून म्हांबरे म्हणाले, गेल्या वर्षभरात टीसीपी मंत्र्यांनी भूसंपादनासाठी १ हजार हून अधिक अर्ज मंजूर केले आहेत. हे करण्यामागे सरकारचा काय हेतु आहे त्याची चौकशी करण्याची नितांत गरज आहे.
लॉकडाऊन दरम्यान  केंद्र सरकारने ईसीला कोळसा आणि डबल ट्रॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी मोले अभयारण्याच्या हद्दीतील झाडे तोडण्याची  पर्यावरण मंजुरी दिली दिली आणि तरीही सावंत सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही,याकडे लक्ष वेधुन सरकारच्या एकूण कारभारावरील सरकारचा विश्वास उडाला असून लोक भाजप सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा म्हांबरे यांनी दिला.