भाजपा महिला मोर्चातर्फे कुंदेत वृक्षारोपण

0
236
गोवा खबर : भाजपा कुडतरी महिला मोर्चा तर्फे आज कुंदे येथील दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कुडतरी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष बबिता बोरकर, नगरसेविका पार्वती पराडकर, राज्य महिला मोर्चाच्या सचिव डॉ. स्नेहा भागवत आणि कुंदे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. स्नेहा भागवत म्हणाल्या, भविष्यासाठी पर्यवरणाचा सांभाळ करण्याची गरज आहे. नैसर्गिक सौदर्य ही गोव्याची खरी ओळख असून ती टिकवून ठेवण्यासाठी झाड लावण आणि ते जगवण महत्वाच आहे. जागतिक तापमान वाढीच्या समस्येचा सामना करण्यासाठी निसर्ग संपदा जपण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे.
उपस्थित नगरसेवीकांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले.