भाजपाध्यक्ष अमित शहा 9 रोजी पणजीत

0
1370

गोवा खबर:लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा  भाग म्हणून 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता महासभेचे आयोजन बांबोळी येथील क्रीडा मैदानावर करण्यात आले आहे. या महासभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. महासभेला 32 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

काल  भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. मोदी सरकार मजबूत करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.  बैठकीला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, तसेच मंत्री विश्वजित राणे, नीलेश काब्राल, मिलिंद नाईक व माविन गुदिन्हो यांची उपस्थिती होती. सुमारे 450 कार्यकर्त्यांची बैठकीला उपस्थिती होती.

‘मेर परिवार भाजप परिवार’ हा कार्यक्रम 12 फेब्रुवारीला सुरु होणार असून 2 मार्च पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाद्वारे सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचे झेंडे लावले जातील. तसेच स्टीकर्स लावण्यात येतील.26 फेब्रुवारी रोजी कमल ज्योती संकल्प उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या घरी जाऊन ज्योत पेटविण्यात येणार आहे. संपूर्ण गोवाभरात एकाच दिवशी हा कार्यक्रम होणार आहे.

2 मार्च रोजी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदार संघातून सुमारे 300 ते 400 मोटरसायकल या रॅलीत सहभागी होतील. सुमारे पंधरा ते सोळा हजार मोटरसायकलचा या रॅलीत सहभाग असेल.

9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता बांबोळी येथील क्रीडा मैदानावर महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती लाभणार आहे. या सभेला 32 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे. प्रत्येक बुथवरुन 25 कार्यकर्ते या महासभेला उपस्थिती लावतील. या सभेची तयारी म्हणून 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत तयारीच्या बैठका होतील. संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या उपस्थितीत महासभेच्या आयोजनाची तयारी होणार आहे.

2019 मध्ये नवा भारत घडविण्यासाठी भाजपला कौल द्यावा असे आवाहन करणारा राजकीय ठराव केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. या ठरावाला मंत्री माविन गुदिन्हो यांनी अनुमोदन दिले. या ठरावाबाबत खासदार नरेंद्र सावईकर यांनी मार्गदर्शन केले. सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला. यावेळी सदानंद शेट तानावडे व दामू नाईक यांची उपस्थिती होती.