भाजपत आता विश्वास आणि वचनबद्धता राहिली नाही:उत्पल पर्रिकर

0
1582
गोवा खबर: माझ्या वडिलांच्या निधनानंतर भाजपने दुसरा मार्ग अवलंबला आहे. भाजपा पक्षातून आता विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मूलगा उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.
पीटीआयशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी  “माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्त्व होतं. ही पक्षाची मुल्यं होती. पण १७ मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. १७ मार्चनंतर पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. आता काय योग्य आहे हे वेळच सांगेल ?”. अशा शब्दात आपली निराशा व्यक्त केली आहे.काँग्रेसच्या 10 आमदारांचा गट भाजप मध्ये विलीन झाल्या नंतर उत्पल पर्रिकर यांनी उघडपणे पक्षावर  तोफ डागली आहे.
१७ मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्या नंतर भाजप पूर्णपणे बदलला असल्याचे उत्पल यांनी अधोरेखित केले आहे.