भाजपच्या काळात पणजीची दुर्दशा:यतीश नाईक यांचा आरोप

0
760
गोवा खबर:भाजपने 1994ची निवडणूक लढवताना जाहिरातबाजी करून सांत इनेज नाल्याची सफाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते.मात्र 2019 साल उजाडले तरी भाजपला ते करून दाखवता आले नाही,असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता यतीश नाईक यांनी आज केला.
नाईक म्हणाले,भाजपच्या काळात पणजीवासियांना मूलभूत सुविधा देखील मिळाल्या नाहीत.भाजप जूनीच आश्वासने देऊन पणजीवासियांची फसवणुक करत आहेत.लोक भाजपला विटले असून यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देतील यात शंका नाही.
नाईक यांनी 1994 साली भाजपने एका स्थानिक इंग्रजी दैनिकाच्या पहिल्या पानावर दिलेल्या जाहिरातीचा संदर्भ देत सांत इनेज नाल्याच्या आणि पणजी शहराच्या दुर्दशेला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी केला.