भाजपच्या आशिर्वादाने मडगावात भिकारी माफीया कार्यरत : गोपाळ नाईक

0
606
गोवा खबर : मडगाव शहरात  भिकारी व बेघरांचे माफीया भाजपच्या आशिर्वादाने कार्यरत आहेत. त्यामुळेच सरकार भिकारी व बेघरांवर कारवाई करीत नाही, असा  आरोप मडगाव गट काॅंग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक यानी केला आहे.
कोविड संसर्गाने आज पर्यंत तिन भिकाऱ्याना मृत्यु आले आहे. काही जणांचे अहवाल येणे बाकी आहे. पंधरा दिवसांमागे मडगावात पहिल्या भिकाऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर स्थानीक आमदार दिगंबर कामत यानी भिकारी व बेघराना निवासी केंद्रात हलवा अशी सातत्याने मागणी करुनही आज पर्यंत सरकार या समस्येवर काहीच कारवाई करत नाही हे दुर्देवी आहे,असे नाईक म्हणाले.
राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला जवळ असलेले काहीजण भिकारी व बेघरांचे माफीया बनले असण्याची शक्यता आहे,असा आरोप करून नाईक म्हणाले, त्यामुळेच आज सरकारी आशिर्वादाने गोव्यातील अनेक भागात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. सार्वजनीक ठिकाणी व ट्रॅफीक सिग्नलवर हे भिकारी लोकांना त्रास देतात याच्या अनेक बातम्या छायाचित्रांसह वृतपत्रांमध्ये छापुन आल्या आहेत. परंतु, सरकारी यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यां सोबत  बैठक घेऊन सर्व भिकाऱ्याना ताबडतोब निवासा केंद्रात हलविण्याची मागणी केली होती. तसेच एसजिपीडीए मैदानावर उभ्या राहिलेल्या बेकायदा निवारा शेड मोडुन टाकण्याची मागणी केली होती. या सर्व बेघराना सरकारने तात्पुरते निवारा केंद्रात ठेऊन नंतर त्यांची रवानगी त्यांच्या मुळ राज्यात करावी असे  कामत यानी सांगीतले होते. परंतु, सरकारने यावर कोणतीच कारवाई आज पर्यंत केलेली नाही हे धक्कादायक आहे,असे नाईक म्हणाले.
सरकारने त्वरित या समस्येवर तोडगा न काढल्यास, आम्हाला लोकांना घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल असा इशारा नाईक यानी दिला आहे.