भाजपच्या आयात केलेल्या प्रवक्त्याच्या वक्तव्यातुन भाजपची ‘बॅग संस्कृती’ पुन्हा उघड: अमरनाथ पणजीकर

0
314
गोवा खबर:  आपले सरकार वाचविण्यासाठी इतर पक्षातील आमदार आयात करण्याची भाजपची “बॅग संस्कृती” संपुर्ण गोमंतकीयांना माहित आहे. आज भाजपचे आयात केलेले प्रवक्ते  उर्फान मुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची ही ‘बॅग संस्कृती’ परत एकदा चव्हाट्यावर आलेली आहे अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दीनेश गुंडू राव यांच्या गोवा भेटीबद्दल उर्फान मुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना अमरनाथ पणजीकर यांनी भाजप प्रवक्त्याचा निषेध केला आहे.
आज भाजपचे आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केलेले वक्तव्य म्हणजे भाजपच्या अंतर्गत कारभाराचे प्रतिबींब आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या हल्लीच्या गोवा भेटीच्या वेळी त्यांनी गोळा केलेल्या बॅगा पोचविण्याची हमाली उर्फान मुल्लाने केली असावी व त्यामुळेच त्यांना भाजपच्या बॅग संस्कृतीचा साक्षात्कार झाला असावा असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
भाजपचे आयात केलेले प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी बी. एल संतोष यांनी मागील गोवा भेटीत किती बॅगा गोळा केल्या त्याची माहिती जनतेला द्यावी. अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला टेकू लावण्यासाठी गोव्यातील आयात केलेल्या आमदारांना कितीच्या बॅगा दिल्या होत्या याची माहिती महामंत्री  सतिश धोंड यांच्याकडुन त्यांनी घ्यावी व जनतेला कळवावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
भाजपने आयात केलेले प्रवक्ते  उर्फान मुल्लांना निवडणूक युतीच्या बाबतीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना  प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपल्याच पक्षाचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांना भेटून पुढील निवडणूकांत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सुचविल्या प्रमाणे भाजप-मगो युतीसाठी ते सुदिन ढवळीकर यांचे बुट चाटणार का याचे स्पष्टीकरण घ्यावे. भाजपचे संघटन सचिव सतिश धोंड यांच्याकडुन त्यानी आयात केलेल्या दहा आमदारांना आगामी निवडणूकीत भाजप पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी तिकीट देणार का याची माहिती घ्यावी असा सल्ला अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकिची रणनिती ठरविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष समर्थ असुन, आयात केलेल्या भाजप प्रवक्त्याला त्याबद्दल माहिती देण्याची आम्हाला गरज नाही. आमचे पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश राव हे सच्चे कॉंग्रेसमन असुन त्यांची पक्ष निष्ठा व प्रामाणिकपणा सर्वांना माहित आहे. त्यांच्यावर आयात केलेल्या भाजप प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध करुन, उर्फान मुल्लानी त्वरित माफी मागावी अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली  आहे.
आयात केलेल्या भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याने भाजपच्या वैचारीक दिवाळखोरीचे दर्शन लोकांना झाले आहे. आज लोकांसमोर जाण्यासाठी भाजपकडे योग्य प्रवक्ते नसल्याने त्यांना ” रिकामा मेंदू व बेताल वक्तव्ये ” करणाऱ्या “बबलूंवर” विसंबून रहावे लागत आहे असा टोमणा अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.