गोवा:पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य राखून प्रदेश भाजपतर्फे 26 सप्टेंबरपासून बूथ विस्तार मोहीम हाती घेतली जाणार आहे.मुख्यमंत्री,आमदार, खासदार,केंद्रीय मंत्री यात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आज दिली.
राज्यातील चाळीसही मतदारसंघातील 1642 बूथांवर ही मोहीम 26 सप्टेंबर पासून एक महीना राबवली जाणार आहे.प्रशिक्षित 375 कार्यकर्ते सगळ्या बूथांवर जावून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहीतील जनरल सेक्रेटरी सदानंद तानावडे यांनी यावेळी दिली. काल राज्यभरातील सर्व बूथ विस्तारकांची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मंडळ, बूथ आणि मतदारसंघ निहाय समन्वयक नेमण्यात आले असून त्यांच्या मार्फत नियोजित कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत.बूथ विस्तारक एका बूथवर 2 दिवस राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री हळदोणे मतदारसंघातील कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे तानावडे म्हणाले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हाती घेतलेल्या मिशन 350 या मोहिमेस अनुसरुन गोव्यात संघटनात्मक काम सुरु झाले असून वर्षभर विविध उपक्रम राबवून पक्षवाढीचे कार्य सुरु असते असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.