भाजपची ती तक्रार म्हणजे फटिंगपणा:गिरीश

0
864

गोवा:पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बूथ नंबर 28 वर घड़लेल्या प्रकाराबाबत काँग्रेसच्या तक्रारी नंतर 5 तासांनी दाखल झालेल्या भाजपच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.भाजपकडून सरकारी यंत्रणेचा ग़ैरवापर सुरु आहे.आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन लक्ष वेधले असून त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वसन दिले असल्याची माहिती काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आज दिली.
चोडणकर म्हणाले,पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी कायदा हातात घेऊन गुंडागिरी केली त्याकडे दुर्लक्ष करून भाजपने चूकीची तक्रार नोंदवली त्याची चौकशी तातडीने सुरु असून हा पक्षपातीपणा आहे.मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री आणि खासदार असून त्यांचा सरकारी यंत्रणेवर दबाव असून त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत.
भाजपने जी तक्रार केली त्यात उल्लेख केलेले 3 कार्यकर्ते घटनास्थळावर नव्हते.भाजप नेते तरुण कार्यकर्त्यांना देखील फटिंगपणा शिकवत असून ही बाब गंभीर आहे.मोबाइल लोकेशनच्या आधारे याचा शोध घेता येऊ शकेल असे चोडणकर म्हणाले.हा फटिंगपणा ज्यांच्या सांगण्यावरुन केला गेला त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी.भाजपला पराभवाची भीती वाटत असल्याने त्यांना गुंडागिरीचा आधार घ्यावा लागला.टोंका आणि मळा भागात असे प्रकार घडले आहेत.काँग्रेस शिवाय आणखी एका पक्षाने देखील अशीच तक्रार दिली असून त्यावरून सगळ स्पष्ट होते.निवडणूक आयोगाने यातील सत्य जनते समोर आणून दोषीवर कारवाई करावी,अशी मागणी चोडणकर यांनी केली.