भाजपची उद्या म्हापशात आभासी राज्य कार्यकारीणी बैठक

0
144
गोवा खबर:कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर म्हापशात उद्या होणारी राज्य कार्यकारीणीची बैठक पहिल्यांदाच आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. त्यात विविध विषयांवर सदस्यां सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत चर्चा केली जाणार आहे.
म्हापसा येथील भाजप कार्यालयात उद्या सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच राज्य कार्यकारीणी बैठकीचे उद्धाटन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे,मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे.
आभासी राज्य कार्यकारीणी बैठकी संदर्भात अधिक माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले,कोविड संकटामुळे पहिल्यांदाच भाजपच्या राज्य कार्यकारीणीची बैठक आभासी पद्धतीने होत आहे.राज्य कार्यकारिणी सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठकीत सहभागी होणार आहेत.
बैठकीत कोविड संकटासह विविध विषयावर चर्चा होणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या चौफेर विकासासाठी सुरु असलेले कार्य आणि अंत्योदय तत्वावर विकासाची गंगा तळागाळात नेण्यासाठी सुरु असलेल्या विविध कामांवर यावेळी चर्चा होणार आहे.