भाजपकडून शिक्षक विभागाची स्थापना

0
366
गोवा खबर:गेल्या काही दिवसांपासून भाजपच्यावतीने नवीन विविध विभाग स्थापन करण्यात येत आहेत. गरज आणि मागणीनुसार सध्या कार्यरत असलेल्या विविध मोर्चा आणि विभागांसह नवीन विभागही कार्यरत करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी दिली.
येथे मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते. श्री. शेट-तानावडे यांनी यावेळी प्रदेश भाजपतर्फे शिक्षक विभाग स्थापण करण्यात आल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिकपासून उच्चशिक्षणापर्यंत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा परिणाम अर्थातच शिक्षकांच्या कामावर होत आहे. तसेच या दरम्यान शिक्षकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी तसेच शिक्षकांना सक्षमपणे कार्यरत ठेवण्यासाठी भाजपने शिक्षक विभाग सुरू केल्याची माहिती श्री. शेट-तानावडे यांनी यावेळी दिली.
या विभागाच्या समन्वयकपदी बाबाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्यपदी सागर वेळीप, लेखराज नाईक, रुपेश गावस, वसंत सैल, अनुप नाईक, समीर नाईक, सुदेश गावकर, कपिल भंडारी, श्रीनिवास पाटील, निलेश नाईक, रजनीकांत सावंत, निकिता नाईक आदींची निवड करण्यात आली असल्याचे श्री. शेट-तानावडे यांनी सांगितले.
यावेळी नवीन विभागाच्या सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. दामू नाईक यांनी स्वागत केले. तसेच आभारही मानले.