भांगराळे गोंय बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0
219

गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाखाली स्वंयपूर्ण गोव्याचे उदिदष्ठ साधण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सांगितले आणि येत्या गोवा मुक्ती दिनापूर्वी देशाच्या या छोट्याशा राज्याला भांगराळे गोंय बनविण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे त्यानी सांगितले.

  नियोजन आणि सांखिकी संचालनालयाने आणि गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामिण विकास संस्थेने पर्वरी येथे आत्मनिर्भर भारत , स्वंयपूर्ण गोवा या विषयावर अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या  प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

 

 मुख्यमंत्र्यानी उच्च शिक्षण संचालनालय आणि जीआयपीएआरडीने तयार केलेल्या अहवालावर सरकारी अधिकाऱ्यानी अभ्यास करून स्थानिक प्रतिनिधीशी  व सदर भागातील सक्रिय समाज क्लबाशी सविस्तर चर्चा करण्याचे सांगितले.

           

मुख्यमंत्र्यानी विविध खात्यामार्फत अंमलात आणण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेण्याचे आणि त्या समझून घेण्याचा सल्ला दिला. पंचायत सचिवांच्या  आणि लिंक अधिकाऱ्यांच्या  मदतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे त्यानी सांगितले. स्वंयपूर्ण गोवा यशस्वी बनविण्यासाठी लघू आणि दीर्घ मुदतीचे उद्दीष्ठ साधण्यासाठी कार्य करण्याचे त्यानी सांगितले.

 सुरवातीस डॉ सिमा फर्नांडिस आणि अश्विन आचार्य यानी आत्मनिर्भर भारत, स्वंयपूर्ण गोवा याची माहिती दिली. स्वंयपूर्ण मित्र पंचायत संचालनालयाच्या मनुष्यबळाचा कसा वापर करतील यावर यावेळी चर्चा झाली.

 

 यावेळी कृषी खाते, फलोत्पादन, पशूसंवर्धन, रोजगार आणि मजूर खाते, ईडीसी, केव्हीआयपी, जिल्हा ग्रामिण विकास संस्था, महिला आणि बाल कल्याण, समाज कल्याण, मत्स्योद्योग खाते, आदिवासी कल्याण, हस्तकला खात्याच्या विविध योजनांची अधिकाऱ्यानी माहिती  दिली. श्री दत्तप्रसाद शेटकर यांनी रिपोर्टिंग आणि मोनिटरींग फोर्मेटची माहिती दिली.