ब्ल्यू व्हेल मोबाईल गेमबाबत गोवा पोलिसांची मार्गदर्शक तत्त्वे जारी

0
1062

शालेय मुलांना भुरळ घालून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा‌ऱ्या ब्ल्यू व्हेल मोबाईल गेमपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोवा पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी संसदेत या विषयावर सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्र सरकारने संभाव्य धोका ओळखून गुगल, फेसबूक, व्हाॅट्स अॅप व इतर सोशल मीडिया तसेच संकेतस्थळावरून ब्ल्यू गेमशी संबंधित सर्व लिंक हटविण्यास सांगितले आहे.पोलिसांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे पालकांनी मुलांच्या मोबाईलवर पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअरचा वापर करावा,त्याच्या मोबाईलवरील इंटरनेट शोध इतिहासाचे निरीक्षण करावे,मोबाईलवरील संदेश, कॉल नोंदी, शोध इतिहास, फेसबूक, व्हाॅट्सअप व इतर सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या संभाषणाची माहिती ठेवावी, काही धोकादायक आढळल्यास संबंधित अॅप्स किंवा संकेतस्थळ बंद करावे,मुलाच्या दैनंदिन वागणुकीतील बदल लक्षात घ्यावा,उदासीनता, नैराश्य वा इतर कोणत्याही मानसिक आजाराबाबत संशय आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा,मुलांकडून शाळेतील इतर विद्यार्थी संबंधित गेम खेळत असल्याचे लक्षात आल्यास शिक्षक आणि पालकांमध्ये त्याबाबत जागृती करावी आदींचा त्यात समावेश आहे.