ब्ल्यू व्हेलच्या लिंक न हटवल्यास कारवाई

0
2778

ब्ल्यू व्हेलच्या लिंक सोशल मीडियावरून हटविण्यात न आल्यास केंद्र सरकार संबंधित माध्यमांवर कठोर कारवाई करेल, असा इशारा केंद्रीय विधी व माहिती, तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी येथे दिला. गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मायक्रोसॉफ्ट आणि याहूला केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत याबाबत बजावले आहे.

या घातकी खेळाच्या नादी लागून आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत केंद्र सरकारकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत असे सांगत हा ऑनलाइन गेम ज्या मीडीयांवर उपलब्ध आहे त्या सर्वांना या गेमची लिंक तातडीने हटविण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. आत्महत्यांची चिथावणी देणारे असे खेळ आपल्या देशात कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.