गोवा खबर:ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्सद्वारे ‘स्टाइल : मोअर यु थिंक’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सारेच उपस्थित स्तिमित होऊन गेले. नामांकित डिझायनर विक्रम फडणीस यांनी विविध प्रकारच्या स्टाइल्सची डिझाइन सादर केली. बँडद्वारे सादर संगीताच्या ठेक्यावर एकाहून एक सरस मॉडेल विविध स्टाइल सादर करत होत्या तर अधूनमधून विदूषकही स्टाइलप्रेमींच्या चेहऱ्यावर हास्याचा खळखळाट आणत होता. विक्रम फडणीसचे डिझाईन सादर करताना सागरिका घाटगे आकर्षणाच्या केंद्रस्थानी होती.
‘स्टाइल : मोअर यु थिंक’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम म्हणजे शुद्धता आणि वेगळेपणा या गुणांचा सोहळाच असून जुनाटपणा खंडित करत आणि जुन्या चौकटीच्या बाहेर पडत प्रत्येकाच्या स्टाइलमधील वेगळेपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. स्टाइलमधील असे बारकावे गुंफत ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स गोव्यात आली आहे.
याबाबत पेरनॉड रिकार्ड इंडियाचे सह-उपाध्यक्ष श्री. राजा बॅनर्जी म्हणाले, “आपले वेगळपण दर्शवणाऱ्या स्टाइलबाबत आजचा ग्राहक तडजोड करत नाही. त्यामुळे स्टाइल ही लोकशाहीचे एक मूलभूत प्रतीक बनली आहे. आपली वेगळी ओळख बनवणे आणि पारंपरिक चौकटीच्या बाहेर पडत आपली खरी ओळख जपण्याचा गुण प्रत्येकाकडे असतो. ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स मधून ‘स्टाइल : मोअर यु थिंक’ या विचारानुसार फॅशनचे हेच कंगोरे संगीत, बॉलिवुड आणि फॅशनचा संगम साधत समोर आणले जात आहे. या कार्यक्रमातून फॅशनप्रेमींना नवा अनुभव मिळत आहे.”
रॅम्पवर अनोखी स्टाइल आणि आपले व्यक्तिमत्त्वाचे अनोखे पेलू सादर करत सागरिका घाटगेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तर संगीताच्या ठेक्यावर फॅशनचे नमुने पेश करत विदुषकानेही आपल्या जोशमय उपस्थितीने माहोल हास्यमय केला.
एकूणच विक्रम फडणीसने सादर केलेले हे कलेक्शन म्हणजे शहरी झालर ल्यालेला श्रीमंत वारसा ठरले. गुलाबी, निळा, हिरवा, गव्हाळ, तपकिरी आदी रंगछटांमधील वस्त्रलंकार, जरदोशी, कुंदन, पर्ल एम्ब्रॉयडरीमधील विणकाम यामुळे पारंपरिक फॅशनला नवी झळाळी मिळाली होती.
याप्रसंगी सागरिका घाटगे म्हणाली, “ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्सद्वारे दरवर्षी प्रत्येक स्टाइलमधील नवे वेगळेपण सादर केले जात आहे. यंदाची ‘स्टाइल : मोअर यु थिंक’ ही संकल्पना म्हणजे एक राष्ट्रीय खेळाडू ते अभिनेत्री असा झालेल्या माझ्या स्टाइलप्रवासाचे पुरेपूर प्रतिबिंब आहे. खेळ ते सिनेमा असा माझा करियरप्रवास या संकल्पनेत सामावलेला आहे. म्हणूनच आज आयकॉनिक प्लॅटफॉर्म ठरलेल्या या रॅम्पवर चालताना फॅशनसोहळ्याबरोबरच माझा जीवनसोहळाच अनुभवत