ब्लॅकबेरीने भारतीय बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. क्वेर्टी (QWERTY) कीपॅड असलेला ‘कीवन’ हा नवीन मोबाइल फोन ब्लॅकबेरीने भारतात लाँच केला आहे. या मोबाइलच्या लिमिटेड एडिशन बाजारात येणार आहेत.

‘कीवन’ या मोबाइल फोनची खास बात म्हणजे हा फोन अँड्रॉइड असूनही त्यात ब्लॅकबेरी कीबोर्ड, ब्लॅकबेरी हब आणि ब्लॅकबेरी डी-टेक वापरता येणार आहेत. ब्लॅकबेरीने या मोबाइलच्या विक्रीसाठी अमेरिकन एक्स्प्रेस आणि वोडाफोन सोबत भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने ग्राहकांसाठी दमदार ऑफर्सही आणल्या आहेत.

अमेरिकन एक्सप्रेसचे क्रेडिट कार्ड असलेल्यांना व अॅमेझॅानवरुन मोबाइल खरेदी करणाऱ्यांना विशेष बोनस पॉइंट्स मिळणार आहेत. याबरोबर वोडाफोन युजर्सना ७५ जीबी डेटा ३ महीन्यांसाठी मोफत मिळणार आहे.