ब्लू डार्टने केली आपल्या यशस्वी वार्षिक ‘राखी एक्सप्रेस’ला सुरुवात, यंदाच्या सणाला आपल्या भावंडांना पाठवा राखी

0
2017

 

 गोवा खबर: ब्लू डार्ट या भारतातील आघाडीच्या लॉजिस्टिक सेवा पुरवठादार आणि डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुप (डीपीडीएचएल) चा भाग असलेल्या कंपनीने रक्षाबंधनच्या निमित्ताने आपल्या वार्षिक कॅम्पेनला सुरुवात केली असून यानिमित्ताने भारतात आणि परदेशात सुरक्षित आणि वेळेत डिलिव्हरीची हमी देऊन राख्या आणि भेटवस्तू सहजपणे पाठवण्याची संधी मिळणार आहे.

ब्लू डार्टची राखी एक्सप्रेस ही एक खास सेवा आहे जी भारतभरात ३५००० पेक्षा जास्त ठिकाणी सेवा पुरवते आणि डीएचएल एक्सप्रेस इझी राखीद्वारे जगभरातील २२० देश आणि प्रदेशांमध्ये राखी पाठवणे शक्य होते. या ऑफर्स भारतभरातील सर्व ६२५ ब्लू डार्ट- डीएचएल रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना एक खास तयार केलेले राखी एन्व्हलप आणि एक ग्रीटिंग कार्ड मोफत मिळेल. भारतात कुठेही ५०० ग्रॅमपर्यंत वजनासाठी राखी पाठवण्याचा खर्च २५० रूपये आहे.

ग्राहकांची सोय अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत असताना ही ऑफर ब्लू डार्ट डीएचएलच्या देशभरात अत्यंत सोयीच्या ठिकाणी असलेल्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये किंवा राखी सर्व्हिससाठी १८६० २३३ १२३४ या क्रमांकावर फोन करून उपलब्ध आहे.

या निमित्ताने काही विशेष बक्षिसेही जिंकता येतील. या वर्षी ३ नशीबवान ग्राहकांना आयफोन६ जिंकण्याची तर २५ नशीबवान ग्राहकांना एक कॉन्टेस्ट स्लोगन फॉर्म भरून ब्लू डार्ट ब्रँडेड हॅवरसॅक बॅग जिंकण्याची संधी मिळेल.

सणासुदीच्या निमित्ताने बोलताना केतन कुलकर्णी, प्रमुखमार्केटिंग, कम्युनिकेशन्स आणि सस्टेनिबिलिटी ब्लू डार्ट म्हणाले की, ब्लू डार्टच्या राखी एक्स्प्रेसमुळे ग्राहकांना भारतातील रक्षाबंधन या अत्यंत आवडत्या सणांपैकी एका सणाला राखी पाठवणे शक्य होते. या ऑफरमुळे भावाबहिणीतील नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते आणि जगभरात कुठेही असले तरी जोडलेले राहणे शक्य होते. कुटुंबे लहान होत असताना आणि लोक शिक्षण, नोकरी, लग्न, कुटुंबाचे स्थलांतर, व्यवसाय किंवा चांगल्या संधींसाठी आपल्या गावांमधून किंवा देशातून बाहेर पडू लागले असताना रक्षाबंधनासारखे सण हे साजरे करणे खूप खास होऊ लागले आहेत.

ते पुढे म्हणाले की, राखी एक्स्प्रेसद्वारे ब्लू डार्टने प्रेमाचे हे प्रतीक साजरे करण्याच्या निमित्ताने वेगवान आणि कोणत्याही अडथळ्यांपासून मुक्त सेवा देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ दिले आहे.

ब्लू डार्ट ही भारतातील सर्वाधिक नावीन्यपूर्ण आणि पुरस्कारप्राप्त एक्स्प्रेस डिलिव्हरी कंपनी असून भारतात एक्स्प्रेस लॉजिस्टिक उद्योगात निर्विवाद आघाडीवर आहे. ३१ मार्च २०१८ रोजी संपणाऱ्या वर्षादरम्यान ब्लू डार्टने सुमारे १९६ दशलक्ष देशांतर्गत शिपमेंट, ०.९२ दशलक्ष आंतरराष्ट्रीय शिपमेंट आणि ६९७,००० टन कागदपत्रे आणि पार्सल यांची हाताळणी देशभरात आणि जगभरातील २२० देश आणि प्रदेशांमध्ये केली आहे.

 

ब्लू डार्टबाबत :

ब्लू डार्ट एक्स्प्रेस लि. ही दक्षिण आशियातील आघाडीची एक्स्प्रेस एअर आणि एकात्मिक वाहतूक आणि वितरण कंपनी असून ती भारतातील ३५,००० पेक्षा अधिक ठिकाणी सुरक्षित आणि विश्वासू सेवा देते. डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुपच्या बिझनेस युनिटडीएचएल ईकॉमर्सचा भाग असलेल्या ब्लू डार्टकडे जगभरातील सर्वांत मोठे आणि सर्वांगीण एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक नेटवर्क आहे. त्यात २२० देश आणि प्रदेश आहेत आणि ती एअर एक्सप्रेस, फ्रेट फॉरवर्डिंग, सप्लाय चेन सोल्यूशन्स, कस्टम्स क्लिअरन्स इत्यादींसारख्या विविध प्रकारच्या वितरण सेवा देते.

ब्लू डार्ट टीमकडून आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी त्यांचे अत्यंत उत्साही लोक, उत्तम दर्जाची एअर आणि ग्राऊंड क्षमता, अद्ययावत तंत्रज्ञान, विविध प्रकारची नावीन्यपूर्ण, चांगली उत्पादने आणि मूल्यवर्धित सेवांद्वारे सातत्याने प्रयत्न करून बाजारातील आघाडीचे स्थान कायम राखले गेले आहे. विश्वासार्हता, उत्तम दर्जाचा ब्रँड अनुभव आणि शाश्वतता यांच्याद्वारे देशातील सर्वाधिक नावीन्यपूर्ण आणि पुरस्कारप्राप्त एक्स्प्रेस लॉजिस्टिक कंपनी म्हणून ब्लू डार्टने आपले नाव कमावले आहे. त्यात ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट, इंडियाकडून इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉरपैकी एक, ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट, आशियाकडून बेस्ट मल्टीनॅशनल वर्कप्लेसेस इन एशियापैकी एक, एओन हेवीटकडून टॉप २५ बेस्ट एम्प्लॉयर्स इन इंडिया २०१६ आणि सलग १० व्या वेळी सुपरब्रँड म्हणून पुरस्कृत आणि सलग ११ व्या वेळी रिडर्स डायजेस्ट मोस्ट ट्रस्टेड ब्रँड आणि फॉर्च्यून ५०० च्या इंडियाज लार्जेस्ट कॉर्पोरेशन्सपैकी एक आणि फोर्ब्स इंडियाज सुपर ५० कंपनीजपैकी एक या गौरवांचा समावेश आहे.

ब्लू डार्टकडून आपली पर्यावरण संरक्षणाची सामाजिक जबाबदारी (गोग्रीन), आपत्कालीन व्यवस्थापन (गोहेल्प) आणि शिक्षण (गोटीच) या उपक्रमांच्या माध्यमातून पार पाडली जाते.