ब्रम्हेशानंद स्वामीजी गोव्याचे भूषण: दिगंबर कामत

0
527
गोवा खबर:विरोधीपक्ष नेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी ‘सदगुरू जन्माष्टमी महोत्सवात’ कुंडई येथिल तपोभूमि मठात श्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजींची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी आशा दिगंबर कामत उपस्थित होत्या. 
गोमंतभूमिचे रक्षण व्हावे व सर्व गोमंतकीयांना सुखी ठेवावे तसेच गोव्यावर आलेले संकटाचे काळे ढग दूर व्हावेत अशी प्रार्थना कामत दांपत्याने श्री स्वामीजी चरणी करुन त्यांचे आशिर्वाद घेतले.
तपोभूमितील श्री दत्त पद्मनाभ पीठाने गोव्याचा धार्मीक व सांस्कृतिक वारसा टिकवुन ठेवण्यासाठी खुप मोठे योगदान दिले असुन, श्री ब्रम्हेशानंद स्वामी महाराजानी देश-विदेशात यात्रा करुन गोमंतकीय परंपरा तसेच धार्मिक सलोखा यांचा प्रसार केला असल्याचे उद्गार विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी मठातील शिष्यवर्ग तसेच भक्तांना संबोधुन केलेल्या भाषणात काढले.
परम पूज्य ब्रम्हेशानंद स्वामीजींचे कार्य भुषणावह असुन, सर्व गोमंतकीयांना त्यांचा अभिमान व आदर आहे असे दिगंबर कामत पुढे म्हणाले.
यावेळी स्वामीजींकडुन कामत दांपत्याला फल मंत्राक्षता देण्यात आल्या तसेच दिगंबर कामत यांना स्मृतिचीन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
आजच्या भेटीवेळी मठानुयायी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.