बोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई 

0
81
भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश

गोवा खबर : फातोर्डा फॉरवर्ड व मॉडेल मडगाव यांनी निवडणुकीत उतरविलेले सिव्हीक अलायन्स युतीच मडगाव पालिकेची निवडणूक जिंकेल अशी खात्री गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपले पॅनल निवडून आल्यावर बोर्डा भागाचे वारसा महत्व कायम ठेवून विकास केला जाईल असे आश्वासन दिले.

प्रभाग 10 मधून उभे राहिलेले फातोर्डा फॉरवर्डचे उमेदवार व्हितोरिनो तावारीस यांच्या प्रचारसभेत बोलताना सरदेसाई यांनी हे आश्वासन दिले. यावेळी प्रतीक नाईक, सुरज शिरोडकर तसेच मारिया रोड्रिग्स यांनी गोवा फॉरवर्ड मध्ये प्रवेश करून आपला पाठिंबा तावारीस याना जाहीर केला.

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, सध्याचे भाजप सरकार हे गोयकरांच्या विरोधातील असून कोळसा वाहतूक आणि गांजाच्या शेतीला प्रोत्साहन देणारे सरकार घरी पाठविण्यासाठी सगळे एकत्र येण्याची सुरवात सध्या सुरू झाली आहे. त्यासाठी टीम गोवा ही संकल्पना पुढे आली आहे. या बदलाची सुरवात यावेळी मडगाव आणि फातोर्डातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरदेसाई म्हणाले, एक काळ होता की भाजप स्वतःला स्वच्छ चारित्र्याचा पक्ष म्हणवून घेत असत मात्र आता ज्यांच्यावर  बलात्काराचे आरोप आहेत असे या सरकारचे महापौर होतात. फातोर्डातही भाजपने तेच केले आहे. ज्यांच्यावर लाच गोळा केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे अशा उमेदवाराला त्यांनी प्रभाग 10 मधून उभे केले आहे. ही केस पुढे गेल्यास हा उमेदवार अपात्र ठरू शकतो असा दावा त्यांनी केला. स्वतःला काँग्रेसचे उमेदवार म्हणवून घेणारे उमेदवार फक्त आमची मते फोडून त्याचा फायदा भाजपाला मिळावा या साठीच रिंगणात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी एक पावल एकचाराचे या एनजीओचे विकास भगत यांनी या सभेस उपस्थिती लावून त्यांनी आपला पाठिंबा फातोर्डा फॉरवर्डला जाहीर केला. गोव्याचा विनाश करण्यासाठी पुढे आलेल्या भाजपला घरी पाठविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकजूट दाखविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी या प्रभागाचे मावळते नगरसेवक ग्लेन आंद्राद तसेच प्रशांत नाईक यांची भाषणे झाली. उमेदवार व्हितोरिनो तावारीस यांनी सर्वांचे आभार मानले