बोटी आणि लहान होड्या मालकांना बंदर खात्याची सूचना
गोवा खबर:मान्सूनच्या काळात व जून ते सप्टेंबर या प्रतिबंधित काळात ज्या बोटी व लहान होड्या न झाकलेल्या स्थितीत असतील त्या प्लास्टीकने झाकून ठेवा किंवा त्यामधील असलेले इतर सामान अशा जागी सुरक्षित जागी ठेवा जेणेकरून लहान होड्या मोकळ्या जागेत खुल्या राहणार नाहीत आणि त्याचा उपद्रव न होता पुनरावृत्ती टळेल असे बंदर खात्याने बोट व लहान होड्यांच्या मालकांना कळविले आहे
जर जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली नाही तर लहान होड्यांमध्ये पाणी जमा होऊन हा गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या ३७ कलमाखाली उपद्रव ठरतो आणि डासांची पैदास होण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन पाण्यापासून उद्भवणारे आजार जसे मलेरीया आणि डेंग्यू होण्याचा संभव असतो.