बोगेनविले लाइफस्‍टाइल फॅशनिस्टा एक्सप्लोर करा – गोवा एडीशन २

0
984

 

  • मीरामार येथील मॅरीयट रिसॉर्ट अँड स्‍पा येथे १३ आणि १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत प्रदर्शन
  • भारतातील महिला डिझायनर एकत्र येणार
  • १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते १.३० आणि ४.३० ते ५.३० वाजता नयनतारा यांच्‍याशी संवाद
  • अर्चना यांच्‍यासोबत १४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत ग्रुमिंग सेशन

गोवा खबर: बोगेनविले लाइफस्‍टाइल गोवा एडीशन २ या भारतातील आघाडीच्‍या फॅशन आणि लाइफस्‍टाइल इव्हेंटने विविध ठिाकणांहून भारतातील आघाडीचे डिझाइनर एकत्र केले. त्‍यामुळे आज हे वन स्‍टॉप डेस्‍टिनेशन फॅशनिस्‍ट लोकांसाठी अस्‍तित्‍वात आहे.

गेल्या वर्षी गोव्यातील लोकांनी दर्शविलेल्‍या अतुलनीय प्रेमामुळे, यावर्षी कार्यक्रमाचे क्यूरेटर्स पूनम मित्तल आणि एएमपी, राधा गोयल या ख्रिसमसच्या सीझनमध्ये बोगेनविले लाइफस्टाईल-एडिशन २ सह परतल्‍या आहेत. ग्राहकांना फक्त फॅशन आणि लक्झरी म्‍हणजेच सुखद अनुभवच मिळवून देत नाही तर मुंबईच्या आघाडीच्या टेबल स्टायलिस्ट असणार्‍या नयनतारा यांच्‍याशी संवाद साधला जाणार आहे. दोन दिवसांच्या कार्यक्रमात स्निप सलून आणि स्पामधील अर्चनाबरोबर करमणूकीचे सत्रदेखील नियोजित केले आहे.

यावर्षी हे प्रदर्शन १३ ते १४ डिसेंबर २०१९ रोजी गोवा मॅरियट रिसॉर्ट आणि स्पा, मिरामार, पणजी- गोवा येथे सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

यावर्षीच्‍या प्रदर्शनात उत्पादनांच्या विविधतेसह 20 डिझाइनर्सचे प्रदर्शन एका छताखाली असेल. यावर्षी ग्राहक आणि डिझायनर यांच्‍यासाठी कार्यशाळा असणार आहेत. या कार्यशाळा व्ही फॅक्टरच्या कु. वैशाली पुराणिक जोशी या क्‍युरेट करणार आहेत.

बोगेनविले लाइफस्टाईलचे प्रदर्शन केवळ गोव्यातच नाही तर बंगळुरुसारख्या देशातील विविध शहरांमध्येही आहे. या प्रदर्शनात गोव्यात प्रथमच लाँच होणार्‍या ब्रँड न्यू समकालीन संग्रहाचेही प्रदर्शन होणार आहे.

गेल्या वर्षी आम्हाला मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला होता आणि यावर्षीसुद्धा आम्‍हाला अशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे. आम्हाला २० हून अधिक चांगल्या डिझाइनर्स व त्यांच्या संग्रहात असणार्‍या फॅशनचे कलेक्‍सन प्राप्त झाले आहे, ज्‍यामुळे या कार्यक्रमासाठी येणारे लोक नक्‍कीच प्रभावित होतील. केवळ उत्पादनांचे प्रदर्शन व्यतिरिक्त या वेळी आमच्याकडे या सर्वांसाठी स्टाईलिंग आणि ग्रुमिंग सेशन्स असेल. ज्‍यामुळे यावर्षीची एडीशन नक्‍कीच चांगली होण्‍यास मदत होणार असल्‍याचे पूनम मित्तल म्‍हणाल्‍या.

हे प्रदर्शन हस्त टँट आणि रनवे फॅशन यांच्‍यातर्फे आयोजित करण्‍यात येणार असून त्यात ‘द व्ही फॅक्टर’, एव्हर, सत्य पॉल, रुह बर्नर्सी, वेरुस्का इ. सारख्या विविध ब्रँडचे प्रदर्शन केले जाणार आहे. ” याशिवाय आम्ही बोगेनविले येथे नवीन फॅशननिगडीत गोष्‍टी शोधण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी देखील मदत करतो. खरेदीदार आणि ब्रँडच्या प्रदर्शनास वाढविण्यासाठी येथे मदत होते. जेणेकरून संपूर्ण देशभरात अस्तित्त्वात असलेल्या विविध ब्रँड आणि डिझाइनर्सबद्दल लोकांना जागरूक केले जाईल, असे राधा गोयल म्हणाल्‍या.

महत्त्‍वपुर्ण डिझाइनर्सच्या सहभागामध्ये नीलगर, हस्त टँट, विशाल कपूर, ध्यान लीला, अनुषा शेख, लोटस सुतर, फिलू मार्टिन्स, मोंटी साली, किका टेबलवेअर, स्नेहा बाग्रेचा, आरती विजय गुप्ता, अमानी मालिका, फॅशन लेबल, द वुड शेपिंग कॉ. आणि सोनल काकोडकर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची माहिती
नयनतारा यांच्‍यासोबत टेबलस्‍टायलिंग
तारिख : १३ डिसेंबर २०१९
वेळ : दुपारी १२:३० ते १:३० (सेशन १)
४:३० ते ५:३० (सेशन २ )

अर्चनासोबत ग्रुमिंग सेशन
तारीख : १४ डिसेंबर २०१९
वेळ : दुपारी १२:३० ते १:३०

बोगेनविले लाइफस्‍टाइलबद्दल:
या प्रदर्शनाच्या माध्यमातून कधीही न पाहिलेले कलेक्‍शन दाखविण्‍यात येणार आहे. बोगेनविले जगभरात त्‍यांच्‍या वैशिष्‍ट्यपुर्ण फॅशनस्‍टाइलच्‍या एकत्रीकरणासाठी ओळखले जातात. महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, मुलांच्‍या कपड्यांपासून ते घरगुती सजावटीपर्यंत, दागदागिने, हँडबॅग आणि उपकरणे यांचा समावेश असलेल्या अनेक शहरांमध्ये जागतिक स्तरावरील फॅशन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. योग्‍य डिझाइनर्ससह सुनिश्चित करून मग चांगल्‍या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले जाते, ज्‍यामुळे प्रत्येकाची खरेदीविषयक आवड पुर्ण होते.