बॉलीवुड अभिनेत्री झरीन खानच्या कारला धडकून युवक ठार

0
1291
 गोवा खबर:उत्तर गोव्यातील नागोवा-हणजुणे येथे काल सायंकाळी बॉलीवुड अभिनेत्री झरीन खान हिच्या कारला धडकुन स्थानिक दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.
हणजुणेचे पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार हा अपघात नागोवा येथे काल सायंकाळी झाला.अभिनेत्री झरीन आपल्या इनव्हो कार मधून कळंगुट येथून नागोवा येथे येत होती.तेथील रस्त्यावर यू टर्न घेताना कारच्या मागून येणाऱ्या दुचाकी चालकाची कारला धडक बसून अपघात झाला.अपघाता मध्ये नितेश गोराल  हा 31 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने म्हापसा येथील सरकार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.हणजुणे पोलिसांनी अपघाताची नोंद करून झरीनचा कार चालक अब्बास अली याला अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका केली.