बेरोजगारीचा दर राज्यात देशात दुसरा, सावंत सरकार रोजगार निर्मितीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे : राहुल म्हांबरे

0
266
गोवा खबर : गोवा हे देशातील महत्वाचे पर्यटनस्थळ आहे परंतु आत्ता बेरोजगार दराच्या बाबतीत धक्कादायकरित्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार हरियाणा नंतर गोवा हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे बेरोजगार राज्य बनले आहे. ही गोष्ट न पटणारी आहे, असे राहुल म्हांबरे म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, गोव्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा दोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाच स्वीकारावा लागेल.
राहुल म्हांबरे म्हणाले की, “तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात अपयशी झाल्यामुळे मुख्यमंत्री गोव्याच्या तरूणांना गांजा लागवड करण्याची क्लुप्ती देत आहेत, जी की अतिशय हास्यास्पद आहे”.
तसेच यापुढेही जाऊन मुख्यमंत्र्यांनी तर हद्दच पार केली त्यांनी उच्चशिक्षित अभियंत्यांना (इंजिनिअर्स) रोजगारासाठी शौचालय बांधायला सांगितले. “उच्चशिक्षित अभियंत्यांना उपहासाने  शौचालय बांधण्यास सांगण्यामुळे डॉ. प्रमोद सावंत यांच्या कोत्या मनोवृत्तीचे व खराब विचारसरणीचे प्रदर्शन झाले”, असे राहुल म्हांबरे म्हणाले.
 तसेच त्यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वासन दिलेली गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळातून आवश्यक परवानग्यांसाठीची ‘एकल खिडकी  मंजुरी/one window clearance’ योजना ही तर सपशेल अपयशी ठरली. सदरचे मंडळ हे  उद्योजकांना मदत करण्यासाठीचे महत्वपूर्ण संस्था आहे. मात्र भ्रष्टाचारामुळे उद्योजकांचा भ्रमनिरास झाला. गोव्यात नवीन उद्योगांना येण्याची काहीच संधी नाही, कारण राज्यसरकारच्या धोरणांमुळे आणि भ्रष्टाचारामध्ये या संस्था व  प्रमोद सावंत सरकारमधील विविध मंत्रालये मंत्री हे बरबटलेले आहेत.
“गोव्यातील औद्योगिक पुनरुज्जीवन अजिबात होत नसताना देखील सावंत सरकार नक्की कशाच्या आधारे दावा करत आहे की, खासगी क्षेत्रात 37,000 नोकऱ्या आणि सरकारी क्षेत्रात 10,000 नोकऱ्या तयार झाल्या.  असा पोकळ दावा करून डॉ. प्रमोद सावंत हे  गोव्याच्या तरुणांच्या जखमेवर मीठ का चोळत आहेत?” असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केला.