‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची व्याप्ती देशभर

0
2406

गोवा खबर:घटते लिंग गुणोत्तर आणि मुलींचे शिक्षण यांबाबतीत कार्य करणारी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना बहु-क्षेत्रीय हस्तक्षेपाद्वारे निवडक जिल्ह्यांमध्ये काम करते. त्याशिवाय देशामध्ये इतरत्र याबाबतीत जनजागृती करण्याचे काम ही योजना करते. याबाबतीत लोकांची मानसिकता बदलणे हे कठिण काम आहे. बाल लिंग गुणोत्तर हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या मार्फत दशकातून एकदा मोजले जाते. ताज्या माहितीनुसार ही योजना सुरु

असलेल्या 161 जिल्ह्यांपैकी 104 जिल्ह्यांमध्ये गुणोत्तरात सुधार आढळून आला आहे. 146 जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतींमध्ये वाढ झाली आहे.

2015 मध्ये सुरु झालेली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना ही 1) महिला आणि बाल कल्याण मंत्रालय (2) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (3) मनुष्यबळ विकास मंत्रालय या तीन मंत्रालयांमार्फत राबवली जाते. या मार्फत गर्भ लिंग निदान कायद्याची अंमलबजावणी, महिलांची प्रसुती पूर्व आणि प्रसुती पश्चात देखभाल, मुलींचे शिक्षण, सामाजिक सहभाग आणि त्यांचे प्रशिक्षण आदी क्षेत्रात काम केले जाते. 2018 -19 पासून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना देशातील सर्व 640 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. ज्या मार्फत 2018-19 मध्ये 280 कोटी रुपयांचा निधी पूरवला गेला. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सुमारे 70 कोटी रुपये तर प्रसार माध्यमांद्वारे जनजागृतीसाठी 155 कोटी रुपयांचा निधी दिला गेला.