बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी 2 विदेशींना अटक

0
903
गोवा खबर:बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी युगांडा येथील कीकाबी डोरीन आणि चार्लस चिडीबीरे या नाइजेरिया येथील नागरिकाला अटक केली.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहीती नुसार कळंगुट पोलिस सायंकाळी 6 वाजता गस्त घालत असताना 2 विदेशी नागरिक संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हीसाची चौकशी केली असता त्यांच्या कडे कोणतीच अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत.
त्यानंतर दोघां विरोधात बेकायदेशीर वास्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.