बेकायदा मद्यविक्रेत्यांना अबकारी खात्याचा दणका,26 जणांवर कारवाई

0
840
 गोवाखबर:प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या मोठ्या वीकेंड दरम्यान ज्यांनी नियमभंग करून मद्यविक्री केली अशा 26 जणांवर अबकारी खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे.मोठ्या वीकेंडला पर्यटक मोठ्या संख्येने येतात त्याचा गैरफायदा उठावत काही मद्य विक्रेते नियमभंग करतात.हे प्रकार रोखण्यासाठी अबकारी खात्याने 6 भरारी पथके नेमुन कारवाई केली.26 जण बेकायदा मद्यविक्री करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.यामध्ये सर्वाधिक म्हणजे 12 प्रकरणे बार्देश तालुक्यातील आहेत.यापुढे देखील अशीच कारवाई करून सुरु असलेले बेकायदा प्रकार मोडून काढण्याचे अबकारी खात्याने ठरवले आहे.