बीस साल बाद फिर एक बार फ्रान्स

0
4698

गोवा खबर:1998 मध्ये स्वतःच्या भूमीतच पहिलावहिला विश्वचषक जिंकणाऱया फ्रान्सने रविवारी विश्वचषक इतिहासात दुसऱयांदा अजिंक्यपदावर 4-2 अशा फरकाने अतिशय थाटात शिक्कामोर्तब केले आणि खऱया अर्थाने नवा इतिहास रचला. विश्वचषक इतिहासात प्रथमच फायनल गाठणाऱया क्रोएशियन संघाचे इरादे बुलंद होते. पण, अति आक्रमकतेच्या नादात त्यांनी हातचेही सर्व फासे गमावले.

ल्युझनिकी स्टेडियमवरील या लढतीत मॅरिओ मँडुझिचकडून 18 व्या मिनिटाला स्वयंगोल झाल्याने फ्रान्सचे खाते आपसूकच उघडले गेले तर ऍन्टोईन ग्रिएझमन (38 वे मिनिट), पॉल पोग्बा (59 वे मिनिट) व किलियन एम्बापेने 65 व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला उत्तम वर्चस्व प्रस्थापित करुन दिले. क्रोएशियातर्फे इव्हान पेरिसिचने 28 तर मॅरिओ मँडुझिचने 69 व्या मिनिटाला असे दोनच गोल होऊ शकले आणि फ्रान्सने हा सामना 4-2 अशा फरकाने जिंकला.

रशियात झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करत जेतेपद मिळवले. कोणात्या ध्यानी मनी नसताना फायनलमध्ये दाखल झालेल्या क्रोएशियाने जिगरबाज खेळी केली. पण विश्वचषकावर त्यांना नाव कोरता आले नाही. पाहूयात या अंतिम सामन्यात आणि स्पर्धेत झालेले विक्रम…

फ्रान्सचे हे दुसरे विश्वचषक विजेतेेपद आहे. याआधी त्यांनी 1998मध्ये विजेतेपद मिळवले होते. त्यांनी 20 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकला.
दोनवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाच्या यादीत आता फ्रान्सचा समवेश झाला आहे. फ्रान्स शिवाय अर्जेंटिना आणि उरुग्वे यांनी दोन वेळा फिफा चषक जिंकला आहे.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 4 गोल करणारा फ्रान्स हा दुसरा संघ ठरला आहे. याआधी 1970च्या विश्वचषकात ब्राझीलने इटलीविरुद्ध 4 गोल केले होते.
फ्रान्सच्या विश्वविजयी संघाचे मार्गदर्शन करणारे कोच दिदियोर डेश्चॅम्प यांनी एक अनोखा विक्रम केला. ते फ्रान्सच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघाचे घटक राहिले आहेत. फ्रान्सने 1998 मध्ये पहिल्यांदा विजेतपद पटकावले त्यावेळी ते खेळाडू म्हणून संघात होते तर यंदाच्या विश्वविजयी संघाचे ते मार्गदर्शक आहेत.
फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामन्यात पहिला गोल हा स्वयंगोल ठरला. फिफा फायनलच्या इतिहासातील हा पहिला स्वयंगोल आहे.
या स्पर्धेत एकूण 12 स्वयंगोल नोंदवण्यात आले. फिफाच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. याआधी 1998 साली सर्वाधिक 6 स्वयंगोल झाले होते.
विश्वचषकात सर्वाधिक 6 गोल नोंदवून इंग्लंडचा हॅरी केन गोल्डन बुटचा मानकरी ठरला
आतापर्यंत झालेल्या 21 विश्वचषक स्पर्धांपैकी 12 वेळा युरोपीय संघ विश्वविजेते बनले आहेत. तर 9 वेळा दक्षिण अमेरिकेतील संघांनी विजेतेपद पटकावले आहे.
विश्वविजेत्या फ्रान्स संघाला 260 कोटी, उपविजेत्या क्रोएशियाला 191 कोटी बक्षीस मिळाले आहे.
फ्रान्सचा एम्बप्पे याला स्पर्धेतील युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
क्रोएशियाचा लुका मॉडरिचला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. लुकाचा हा बहुदा शेवटचा विश्वचषक असावा.

इंग्लडचा हॅरी केनने ‘गोल्डन बूट’चा मानकरी

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूला ‘ग्लोडन बूट’ देऊन गौरविण्यात येते. या वेळी इंग्लडचा हॅरी केनने ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला. हा मान मिळविणारा तो इंग्लंडचा दुसराच खेळाडू ठरला. यापूर्वी, १९८६मध्ये इंग्लंडच्या गॅरी लिनेकर यांनी हा मान मिळविला होता. बेल्जियमचा रोमेलू लुकाकू, फ्रान्सचा ग्रीझमन, रशियाचा डेनिस चेरीशेव आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी प्रत्येकी ४ गोल नोंदविले.

आतापर्यंतचे मानकरी : २०१८ : हॅरी केन – गोल (इंग्लंड); २०१४ : हामेस रॉड्रीगेज – ६ गोल (कोलंबिया); २०१० : थॉमस म्यूलर – ५ गोल (जर्मनी); २००६ : मिरोस्लाव क्लोज – ५ गोल (जर्मनी); २००२ : रोनाल्डो – ८ गोल (ब्राझील); १९९८ : डाव्हर सुकेर – ६ गोल (क्रोएशिया); १९९४ : हरिस्टो टोइचकोव – ६ गोल (बल्गेरिया), ओलेग सालेंको – ६ गोल (रशिया); १९९० : साल्वातोर स्किलाची – ६ गोल (इटली); १९८६ : गॅरी लिनेकर – ६ गोल (इंग्लंड); १९८२ : पावलो रोस्सी – ६ गोल (इटली); १९७८ : मारिओ केम्पेस – ६ गोल (अर्जेंटिना); १९७४ : झेगोर्झ लाटो – ७ गोल (पोलंड); १९७० : गेर्ड म्यूलर – १० गोल (जर्मनी); १९६६ : युजेबियो – ९ गोल (पोतुर्गाल); १९६२ : फ्लोरियन अल्बर्ट – ४ गोल (हंगेरी), व्हॅलेंटिन इव्हानोव – ४ (सोव्हिएत युनियन), ड्राझेन एरकोविच – ४ (युगोस्लाव्हिया), लिओनेल सँचेझ – ४ (चिली), व्हाव्हा – ४ (ब्राझील), गारिंचा – ४ (ब्राझील); १९५८ : जस्ट फाँटेन – १३ गोल (फ्रान्स); १९५४ : सँदोर कोचिस – ११ गोल (हंगेरी); १९५० : आदेमीर – ९ गोल (ब्राझील); १९३८ : लिओनिडस – ८ गोल (ब्राझील); १९३४ : ऑल्ट्रीच नेडली – ५ गोल (चेकस्लोव्हाकिया); १९३० : स्टॅबिले – ८ गोल (अर्जेंटिना).