बिग डॅडी एंटरटेनमेंटची गोमंतकीयांसाठी ‘अवर स्टेज युवर टॅलेंट’ स्पर्धा

0
992
गोवा खबर : गोमंतकीयांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने बिग डॅडी एंटरटेनमेंटच्या वतीने अवर स्टेज युवर टॅलेंट या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गोमंतकीयांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वोत्तम कलाकारांना पुढे आणण्यासाठी या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
गोवा राज्य म्हणजे कलाकारांची खाण समजला जातो. कन्टेम्पररी, पारंपरिक आणि अगदी आधुनिक कलाप्रकारांमध्ये गोमंतकीयांनी आपले स्थान प्रस्थापित केले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील तरुण पिढीमधील या कलाविश्वाच्या विकासाला प्रोत्साहन देणे, एक व्यासपीठ देण्याचा उद्देश बाळगून बिग डॅडी एंटरटेनमेंटने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लि. चे एंटरटेनमेंट संचालक श्रीमती झबिन खान म्हणाल्या, “उभरत्या कलाकारांना व्यावसायिक मंचावर आपले कलागुण सादर करता यावेत आणि त्याद्वारे मनोरंजन क्षेत्रातील करिअरची कवाडे उघडता यावीत यासाठी व्यासपीठ मिळवून देणारा अवर स्टेज युवर टॅलेंट (ओएसवायटी) हा अशा प्रकारचा पहिलावहिला उपक्रम आहे. या स्पर्धेतून आजवर पडद्यामागे लपून राहिलेले कलाकार प्रकाशझोतात येतील आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.”
कला, संगीत, अभिनय, नृत्य, गायन, स्टँड-अप कॉमेडी अशा क्षेत्रातील कलाकारांकडून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याची नावनोंदणी सुरू झाली असून ती २० ऑगस्ट २०१९ पर्यंत चालणार आहे. सर्वोत्तम २० कलाकार निवडण्यासाठीची निवड चाचणी २८ ऑगस्ट २०१९ रोजी होणार असून त्यानंतर उपांत्यफेरीसाठी सर्वोत्तम २० स्पर्धकांची निवड १० सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. तर ११ सप्टेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
ओवायएसटी- अवर स्टेज युवर टॅलेंट स्पर्धेतील विजेत्याला ३ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, गिफ्ट हॅम्पर्स आणि बिग डॅडी कॅसिनोसाठी एक वर्षांसाठीचे करारपत्र अशी बक्षिसे मिळण्याची संधी आहे.